बारामती : एका बावीस वर्षीय महिला प्रशिक्षकेने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक १२/१२/२०२४ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मी आमच्या व्यायामशाळा (जिम) मधील प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण देण्यासाठी हजर असताना आमच्याच व्यायामशाळेतील पुरुष प्रशिक्षणार्थी स्वप्निल जगताप याने लेग प्रेस मशीनवर व्यायाम करुन झाल्यानंतर त्याने त्या मशीनवर २५ किलो वजनाच्या २ ते ३ लोखंडी चकत्या (प्लेट) लावलेल्या होत्या, म्हणुन मी त्यांना लावलेल्या प्लेट काढुन ठेवा असे म्हणाले तर त्यांनी मी प्लेट काढणार नाही, जीम तुझ्या बापाची आहे का असे बोलला त्यावर मी त्यांना म्हणाले की, सर बापावर का जाताय?
त्यावेळी त्यांनी माझ्या उजव्या गालावर चापट मारली व त्याचे हाताच्या दंडाने माझा गळा आवळुन मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्या अवस्थेत माझा श्वास गुदमरला होता. त्यानंतर त्या भांडणात त्याने मला लज्जा उत्पन्न होईल अशा ठिकाणी हात लावून व दाबून त्याने त्याचा पायाचा गुडघा माझ्या पोटात मारला.
जीममधील इतर प्रशिक्षणार्थी यांनी स्वप्निल जगताप यांस माझ्या पासून बाजुला केल्यानंतर देखील त्याने मला तुला पिस्तुलेने मारुन टाकेन, तुझा जीव घेवुन टाकीन, तुझ्या खानदानाला मारुन टाकीन,अशी जीवे मारण्याची धमकी दिली तसेच त्याने मला माझे आई माई वरुन अश्लील शिविगाळ करीत माझा ओप्पो कंपनीचा मोबाईल खाली जमीनीवर आपटला व त्याचा डिस्प्ले फोडून माझे अर्थिक नुकसान केले आहे.

हा प्रकार घडला असता मी माळेगाव पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी जीम मधुन बाहेर पडत असताना स्वप्निल जगताप हा फोनवरुन कोणाला तरी बोलत होता ‘मला घोडा पाहीजे,मला एक जणाला ठोकायचे आहे’ असे सांगत असल्याचे मी स्वतः ऐकले आहे
वरील प्रकारबाबत त्याच दिवशी सकाळी साधारण नऊ वाजता मी माळेगाव पोलीस ठाणे येथे जगताप याच्याशी झालेल्या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी गेले असता तेथे हजर असलेल्या महीला पोलीस यांना घडला प्रकार सांगितला त्यानंतर त्यांनी मला औषधोपचार करण्यासाठी पाठवले, त्यांनी मला औषधोपचार करुन माळेगाव पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी परत या असे सांगितले.
माळेगाव पोलीस ठाणे येथुन मला मेडीकल यादी देण्यात आली होती त्या प्रमाणे मी प्रथम सिल्वर ज्युबिली रुग्णालय बारामती येथे उपचारासाठी गेले व तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी माझी तपासणी करून मला इंजेक्शन दिले व पुढील उपचारासाठी त्यांनी मला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे जाण्यासाठी सांगितले.
पुढील उपचार घेतल्यानंतर मी माळेगाव पोलीस ठाणे येथे माझी तक्रार देण्यासाठी न जाता मी घाबरलेली असल्याने माझ्या राहत्या घरी निघुन गेलेले होते.

माझ्या बाबतीत वरील प्रमाणे घडले असल्याने स्वप्निल जगताप (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याचे विरुद्ध माझी कायदेशिर फिर्याद आहे.
असे महिला प्रशिक्षकीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दाखल अंमलदार पो.हवा.अवघडे यांच्यासह तपासी अंमलदार पो.हवा.सय्यद हे माळेगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढिल तपास करीत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा