
बारामती, दि. ३०: रस्ते अपघातातील अपघातग्रस्तांना मदत करा, जीवनदूत बना, वाहन चालवितांना वाहतुकविषयक नियमांचे पालन करावे तसेच स्वयंशिस्त ही महत्वाची बाब असून त्याचे पालन करुन वाहन चालविल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियान-२०२५’ समारोप समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे, मोटार वाहन निरीक्षक बजरंग कोरवले, सहायक मोटार वाहन निरीक्षक हेमलता मुळीक हर्षदा खारतोडे, रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सातव, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर, प्रा. डॉ. अशोक काळंगे आदी उपस्थित होते.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी प्रास्ताविकात दरवर्षी प्रमाणे यंदाही रस्ता सुरक्षा विषयक जनजागृतीच्यादृष्टीन आयोजित रस्ता सुरक्षा अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.
यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते रस्ते सुरक्षा जनजागृतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण तसेच रस्ता सुरक्षा संबंधित विविध कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभागी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वाहन वितरक, पत्रकार, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे पदाधिकारी, बारामती बुलेट क्लब व रेसिंग क्लबचे सदस्य, अग्निशमन विभागाचे अधिकारी, महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा