बारामती:श्री. कैलास एकनाथ पवार शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती बारामती यांचा सेवापुर्तीचा सत्कार समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यांनी आपला सेवा काळ ३८ वर्ष ०४ महिने १३ दिवस पूर्ण करून आपली सेवा पूर्ण केली व त्याच निमित्ताने सर्व केंद्रप्रमुख बारामती व शिक्षक संघटना व सर्व शिक्षक बारामती तालुका यांनी त्यांच्या सेवापुर्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या सत्कार समारंभ मा. गटशिक्षण अधिकारी निलेश गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्री.सुनील भगत सोमेश्वर सहकारी कारखाना संचालक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सतीश मामा खोमणे जिल्हा परिषद पुणे माजी अध्यक्ष, श्री.विश्वासराव देवकाते पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात श्री तुकाराम पवार, शिक्षक नेते केशवराव जाधव राज्याध्यक्ष महाराष्ट्र, शरद मचाले,अशोक माळशिकारे संचालक ,दत्तात्रेय भोसले अध्यक्ष, सरपंच रवींद्र खोमणे, मा.दत्ता बनकर वडगाव नि, बहिणी निशा गावडे त्यांची मुलगी पूजा पवार फलटण यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
श्री कैलास पवार यांची मुले अभिषेक पवार ,अभिजीत पवार सुनबाई अंकिता पवार यांनी सर्वांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.निलेश गवळी यांनी प्रस्तावित केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील तात्या भगत यांनी कैलास पवार यांच्या बद्दल गौरउद्गार काढून त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि एक शिक्षक कसा एक उच्च भरारी घेऊ शकतो याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सुरेंद्र गायकवाड सर भारत पवार सर आणि केशवराव आगवणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सुन ज्ञानेश्वरी अभिजीत पवार यांनी केले .यावेळी पंचायत समितीतील सर्व शिक्षक विभागातील कर्मचारी सहकारी आणि कोराळे बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व नातेवाईक शिक्षक संघ पदाधिकारी शालेय समित्या, विद्यार्थी,पालक यांच्यासह गटशिक्षण अधिकारी तालुका पुरंदर श्री संजय जाधव साहेब,नवनाथ कुचेकर सौ.मंगल आगवणे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती बारामती व शिक्षक कर्मचारी सहकारी उपस्थित होते.

श्री कैलास पवार यांच्या विषयी थोडक्यात माहिती….

श्री कैलास पवार यांचे प्राथमिक शालेय शिक्षण वडगाव निंबाळकर या ठिकाणी झाले व ते पुढील शिक्षणासाठी बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, त्यांनंतर सोमेश्वर नगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पुढिल शिक्षणासाठी पुणे येथे गेले व त्याठिकाणी आपले शिक्षण पूर्ण करून जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी शिक्षक म्हणून १९८६ मध्ये रूजू झाले व कोराळे बुद्रुक या ठिकाणी आपल्या नोकरीची सुरुवात केली वडगाव निंबाळकर केंद्र शाळेतील शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले शिक्षण क्षेत्रात कसे राहावे याचे मार्गदर्शन मा. कै.शिवाजीराव होळकर यांनी गुरु म्हणून शिक्षण दिले अतिशय शिस्तबद्धपणे मुलांना शालेय शिक्षण मिळावे यासाठी खूप धडपड करून मुलांना आरोग्य विषयी सवयी लावल्या अभ्यास करण्याची वृत्ती असावी वाचन घडावे, खेळात प्राविण्य मिळावे यासाठी प्रयत्नशील राहून कार्य केले,परिस्थिती नाजूक असेल तर त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत करणे, आई-वडिलांची माया त्यांना देणे अशा गोष्टींबरोबर जीवनात स्वतः चांगले कसे जगावे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
त्यांनी आपल्या सेवा काळातील ३८ वर्ष शिक्षण क्षेत्रासाठी घालवली. त्यांनी कोराळे खुर्द, सावंत वस्ती ,कोराळे बुद्रुक लाटे,कटफळ,इंदापूर अंथूर्णे, सोनगाव,आणि कोराळे बुद्रुक लक्ष्मी नगर येथे एक चांगला शिक्षक म्हणून नोकरी अतिशय काटेकोरपणे केली.
मार्च २०२४ मासाळवाडी येथे पात्र मुख्याध्यापक म्हणून अतिशय चांगले कामकाज केले यानंतर जिल्हा परिषद पुणे मार्फत शिक्षण विस्तार अधिकारी बारामती ढवाण वस्ती या ठिकाणी कामकाज पाहिले.
या काळात सुद्धा शिक्षकांना योग्य मार्गदर्शन देण्याची जबाबदारी त्यांनी योग्य पध्दतीने सांभाळत बारामती तालुका पंचायत समितीत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार,पुणे जिल्हा पुरस्कार प्राप्त केले,
तर देशपातळीवरील कबड्डी स्पर्धेत २६ देशांचा सहभाग असलेल्या या क्रीडांगणावर गालीचा रांगोळी १० फुट जाड व ८ इंच अशा आकारात सहकारी शिक्षक यांच्या सोबत स्वागत कमानीवर काढण्यात आली,
त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या हस्ते मा श्री. शरदचंद्रजी पवार यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात आली होती.
इंदापूर येथील पहिली ते चौथीचे विद्यार्थी विमान प्रवास व कटफळ ते बारामती रेल्वे प्रवासाचा आनंद विद्यार्थी मुलांना घडवून दिला.
सन २०१७ प्रो कबड्डी महाराष्ट्रातील नऊ खेळाडू यांच्या सहवासात पुणे जिल्हा परिषद सोनगाव शाळेतील मुलांचा इयत्ता दुसरी आणि तिसरी मधील मुलांचा संघ हा मॅटवर खेळवण्यात आला त्यावेळी कैलास पवार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन दिले.
पुणे जिल्हा परिषद सदस्य मा.श्री रोहित दादा पवार व सदस्य श्री विश्वासराव देवकाते यांच्यासमोर प्रेक्षणीय सामना या मुलांनी केला यावेळी जिल्हा क्रीडा संकुल बारामती दादा आढाव यांनाही मार्गदर्शन केले.

हा सर्व आनंद संपूर्ण जिल्हा समोर जिल्हा परिषद शाळा सोनगाव मुलांना प्रत्यक्ष मिळवून दिला.
कोराळे बुद्रुक लक्ष्मी नगर शाळेतील मुलांचा शालेय जीवनपट पियाजो कंपनीमार्फत कंपनी संचालक मा श्री. चोप्रा साहेब मा.श्री. संजय जाधव विस्ताराधिकारी कंपनी व्यवस्थापकच्या कुमारी.जोशी मॅडम, जवारे सर व तात्या सर्वांच्या सहकार्याने मा अध्यक्ष भुजंगराव पडळकर यांच्या कुटुंबीयांसोबत शाळेतील मुलांचा चित्रफीत तयार करण्यात आली या चित्रफितीत लक्ष्मीनगर धनगर वाडा आदिवासी मुलांनी अशाप्रकारे उत्कृष्ट चित्रफीत कलेचे सादरीकरण केले. अशा अशाप्रकारे केलेल्या कामामुळे कैलास पवार हे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून मुलांच्या मनात राहिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा