
बारामती: दि. २६/०१/२०२५ रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता नेवसेवस्ती खोर, ता. दौंड जि. पुणे येथे फिर्यादी श्री.उत्तम शंकर नेवसे यांच्या राहत्या घरामध्ये प्रवेश करून सुरा तसेच कोयत्याचा धाक दाखवून अनोळखी तीन इसमांनी घरातील कपाटात ठेवलेले ३०,०१७/-रु. रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून नेले अशा मजकुराच्या फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खोर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले तसेच सदर गुन्हयाच्या अनुषंगाने माहिती प्राप्त केली असता सदरचा गुन्हा हा रोहित उर्फ पिल्या प्रविण पवार, रा. आळंदी म्हातोबाची ता. हवेली जि. पुणे याने व त्याचे साथीदारांनी केला असल्याचे गोपनीय माहिती यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली.

सदर गुन्हयातील आरोपी हे सोने विक्री करिता भांडगाव या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाल्याने यवत गुन्हे शोध पोलीस पथकाने सापळा रचून व वेशांतर करून तीन संशयित इसमांना ताब्यात घेवून तपास केला असता त्या इसमाचे नाव नितीन सुकराज भोसले, रा. सुपा ता. दौंड जि.पुणे आहे असे समजले अधिक तपास करत असताना त्याचेकडे विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला. सदर मोबाईलबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदरचा मोबाईलबाबत माहिती घेतली असता सदरचा विवो कंपनीचा मोबाईल हा मौजे खोर येथे चोरी केलेल्या ठिकाणचा फिर्यादी यांचा असल्याचे समजले.
सदर संशयित इसमांना सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपासकामी ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा रोहित उर्फ पिल्या प्रविण पवार, रा. आळंदी म्हातोबाची ता. हवेली जि. पुणे व नितीन सुकराज भोसले, वय ३१ वर्षे आणि रोहित राजेश काळे, वय २२ वर्षे दोघे रा. सुपा ता. बारामती जि. पुणे यांनी केला असून त्यांचा एक साथीदार त्याचे नाव आयशाम विलास भोसले, रा.सुपा ता. बारामती जि. पुणे यांनी संगनमताने केला असल्याची कबुली दिली.

त्यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आले असुन पोलीस कस्टडीत चौकशी दरम्यान त्यांनी यवत पोलीस स्टेशन हदिदतील इतर १३ घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.या आरोपींकडून एकूण १४ गुन्हयातील १२० ग्रॅम सोन्याचे दागिने, १५ भार चांदीचे दागिने, ३०,०१७ रू. रोख रक्कम तसेच गुन्हयात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण १२,३०,०१७ रू. किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई हि मा. श्री. पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिराजदार अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा.श्री. बापुराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड, मा.श्री. अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, सपोनि राहूल गावडे (स्था.गु.शा), पो.हवा. संदीप देवकर, पो.हवा. गुरूनाथ गायकवाड, पो. हवा. अक्षय यादव, पो. हवा. विकास कापरे, पो. हवा. दत्ता काळे, पो.हवा. महेंद्र चांदणे, पो.हवा. रामदास जगताप, सफौ सुभाष शिंदे, सफौ सचिन घाडगे (स्था.गु.शा), पो.हवा. अजित भुजबळ (स्था.गु.शा), पो. हवा. विजय कांचन (स्था.गु.शा), पो. कॉ. धिरज जाधव (स्था.गु.शा), पो.कॉ. मारूती बाराते, पो.कॉ. अमोल भुजबळ, पो. कॉ. मोहन भानवरो यांच्या पथकाने केली आहे.

एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास पोलिसांमार्फत झाल्याने परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा