लाटे: ता.बारामती येथे दिनांक ०३/११/२४ रोजी दुपारी २ वाजता एका मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाने तीन वाहनांना धडक दिली व तब्बल नऊ जणांना गंभीर जखमी केले आहे.
अपघात करून चालक पळून जात असताना स्थानिक जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
विशाल जगताप रा.बाजरंगवाडी ता.बारामती असे मद्यधुंद चालकाचे नाव आहे. व तो बजरंगवाडी कडून लाटे बाजूकडे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत जात होता. दारूच्या नशेत झिंगलेल्या चालकाने धडक दिल्याने वसंत साहेबराव जाधव, तसेच सचिन बबन कदम, गौरी सचिन कदम यांच्यासह देव चव्हाण व श्री चव्हाण ही दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यात दोन लहान मुलांचे मांडीतून पाय मोडल्याचेही सांगण्यात आले आहे.
चालक तरुण हा नेहमीच दारूच्या नशेत असतो. व दारू पिलेल्या अवस्थेतच यापूर्वीही त्याने अनेक लोकांना गाडीने उडवले आहे व लोकांना जखमी केले आहे.
अशी स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे,
अशी बेदरकारपणे वाहन चालवून कुणाचा तरी जीव जाण्याची शंका असल्याने,अशा बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या युवकावर कडक कारवाई करावी असे अशी स्थानिक लोकांची मागणी आहे.
सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार देवकर व ओमासे करत आहेत.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा