ब्रेकिंगमहाराष्ट्र
विद्यार्थी,विद्यार्थिनींची सुरक्षितता याअनुषंगाने वडगांव निंबाळकर पोलिस Action मोडवर….
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांची हद्दीतील शाळांना भेट.

0
1
4
5
6
9
वडगांव निंबाळकर:शाळा व महाविद्यालय परिसरातील शांतता व सुव्यवस्था तसेच शालेय विद्यार्थिनींची सुरक्षितता या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक,श्री.सचिन काळे,बीट अंमलदार श्री,पन्हाळे साहेब,श्री नाळे साहेब,श्री देवकर साहेब,श्री,भोसले साहेब यांनी वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर या शाळेस भेट दिली.माननीय प्राचार्य श्री तांबे सर शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
विद्यार्थी व विद्यार्थिनीनी स्वतःची सुरक्षा,सुव्यवस्था,तसेच मोबाईलचा कमी वापर करावा किंवा त्यापेक्षा मैदानी खेळ खेळा चांगले संस्कार रुजवा असे मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर शाळा बाह्य व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांच्या कडून कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर न घाबरता ११२ नंबर डायल करा आम्ही त्वरित त्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले.
तसेच शाळा परिसरातील जे टपरी चालक तसेच छोटे मोठे दुकानदार जे गोळ्या,बिस्कीट विक्रेते आहेत त्यांची दुकाने तपासणी करुन त्या ठिकाणी काही तंबाखूजन्य पदार्थ गुटखा वगैरे तसेच धूम्रपान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू,पदार्थ अशा गोष्टींची विक्री करीत आहेत का याबाबत खात्री केली तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सदृश्य वस्तू विक्री न करण्याबाबत कडक सुचना दिल्या.
तसेच मुला मुलींमध्ये याबाबत जागृती केली तसेच,सीसीटीव्ही यंत्रणेबाबत समाधान व्यक्त केले. शाळेला सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी तसेच मधल्या सुट्टीमध्ये पोलिसांचे निरीक्षण असणार आहे.मुलींना त्रास देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची कायद्याच्या कचाट्यातून सुटका होणार नाही हेही स्पष्ट केले. शाळेचे प्राचार्य श्री.तांबे सर यांनी सर्वांचे आभार मानले.
या बरोबरच त्यांनी कोऱ्हाळे बुद्रुक येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथेही भेट देऊन तेथील शिक्षक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनीनां मार्गदर्शन केले,११२ नंबर बाबत माहिती दिली.त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.