आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयास क्रीडा साहित्य प्राप्त.
श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द यांना जिल्हा क्रीडा विभाग पुणे यांच्याकडून क्रीडा साहित्य प्राप्त झाले.

0
1
4
5
6
9
पिंपरे खुर्द,निरा: येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द या विद्यालयाने जिल्हा क्रीडा विभाग पुणे यांच्या यांच्याकडे क्रीडा साहित्याच्या मागणीबाबत प्रस्ताव दिला होता,
त्या प्रस्तावावर निर्णय घेऊन जिल्हा क्रीडा विभाग पुणे यांनी सदर प्रस्तावास मंजुरी दिली व त्यानुसार तीन लाख रुपये किमतीचे खेळाचे साहित्य वरील शाळेस प्राप्त झाले.
यामध्ये खेळ साहित्यात हॉलीबॉल किट, फुटबॉल,हँडबॉल किट उंच उडीचे स्टॅन्ड, कॅरम,टेनिस किट, लांब उडीचे स्टॅन्ड, भाला, खो खो डाम, क्रिकेट किट,इत्यादी आधुनिक क्रीडा साहित्याचा समावेश आहे.
निबूत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री सतीश शिवाजीराव काकडे देशमुख तसेच उपाध्यक्ष मा.श्री.भिमराव बनसोडे सर यांच्यासह संस्थेचे मानद सचिव मदनराव काकडे दे. मुख्याध्यापक श्री.नेवसे कैलास भैरु विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.दत्तात्रेय बुनगे लिपिक श्री.शिवाजीराव काकडे
यांच्या सर्वांचे वतीने जिल्हा क्रीडाधिकारी पुणे यांचे आभार मानण्यात आले.
नवीन क्रीडा साहित्य मिळाल्याने क्रीडा शिक्षक तसेच खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.