Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

माळेगाव पोलीसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या,- तीन जणांविरूध्द पुन्हा तडीपारीची कारवाई

गुन्हेगारांवरती जरब बसविण्यासाठी दोन महिन्यात सहा जणांना केले तडीपार.

0 1 4 5 6 9

बारामती : गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा व त्यांच्यावर कायद्याचा धाक राहावा हे पोलिसांच्या कर्तव्याचा एक भाग आहे, व पोलीस त्यासाठी नेहमी जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत असतात.

अशाच एका कारवाईमध्ये माळेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे आणि बारामती शहर पोलीस ठाण्यात नागरीकांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन नागरीकांना मारहाण करणे तसेच घातक शस्त्रांचा वापर करून गावातील व्यापारी, हॉटेल व्यावसायीक, टपरीधारक व इतर छोटेमोठे व्यवसाय करणारे लोकांना दमदाटी करून त्यांचेकडुन पैसे उकाळणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मेडद ता. बारामती जि.पुणे या गावातील एका टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली या मध्ये टोळी प्रमुख महेश उर्फ एक्का दत्तात्रय काशीद, वय ३२ वर्षे, टोळी सदस्य १) टोळी सदस्य सुरज उर्फ माउली सोमनाथ काशीद, वय-२२ वर्षे रा. मेडद ता. बारामती जि. पुणे. तसेच इंद्रजित माणिक सोनवणे, वय-२५ वर्षे रा.क-हावगज ता. बारामती जि. पुणे. यांना ०१ वर्षे कालावधीकरीता संपुर्ण पुणे जिल्हा (पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयसह) सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यामधून हद्दपार करण्यात आले आहे. यागावगुंडांच्या वाढलेल्या दहशतीमुळे सर्वसामान्य लोक, मजुर, नोकरदार वर्ग गावतील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, टपरीधारक व इतर छोटेमोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक या सर्वाना यांच्या गुन्हेगारी कृत्यापासुन भयमुक्त करण्यासाठी व त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा बसावा व त्यांचेवर कायद्याचा धाक राहावा कारण तो आवश्यक असल्याने त्यांना संपुर्ण पुणे ग्रामीण जिल्हयातुन तडीपार करावे या करीता माळेगाव पोलीस ठाणे यांच्याकडून वरील इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. 

या तडीपार प्रस्तावाची मा. पोलीस अधीक्षक सो. पुणे ग्रामीण यांनी सखोल चौकशी करुन वरील नमुद इसमांना ०१ वर्षे कालावधीकरीता संपुर्ण पुणे जिल्हा (पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयसह) सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यामधून हद्द‌पारचे आदेश केले आहेत.

सदरची कारवाई मा. पंकज देशमुख साो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा.श्री. गणेश बिरादार सो. अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.डॉ.श्री. सुदर्शन राठोड सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री. अविनाश शिळीमकर सो., वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री.सचिन लोखंडे, तसेच प्रतिबंधक कारवाई विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. तुषार भोर, पो.कॉ.श्री. जालिंदर बंडगर यांनी केलेली आहे. याकामी त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, पुणे ग्रामीण यांचेकडील स. फौ. श्री. महेश बनकर, पो. हवा.श्री. रामदास बाबर यांचे सहकार्य मिळाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे