वडगाव निंबाळकर: दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती’ व ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात समूह वाचन केले.

‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे प्रशालेचे प्राचार्य श्री हेमंत तांबे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर श्री अनिल पाटील सरांनी वाचन कसे करावे व वाचनाने आपले करियर कशा प्रकारे घडते किंवा वाचनाच्या माध्यमातून काय काय संधी आहेत या विषयावर मार्गदर्शन केले.
कु अस्मिता माने इयत्ता दहावी अ मधील विद्यार्थिनीने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना आपल्या भाषणामधून सांगितला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.काळे सरांनी तर श्री.मोहन गायकवाड सरांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा