Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

देवळाली प्रवरा नगरपालिकेची घरपट्टी पाणीपट्टी कमी करा.!

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जनआंदोलन उभे करणार- आप्पासाहेब ढूस 

0 1 4 5 6 9

अ.जिल्हा प्रतिनिधी

देवळाली प्रवरा – दि.१ डिसें.२४

देवळाली प्रवरा नगरपालिकेने मोठया प्रमाणात घरपट्टी मध्ये वाढ केली असुन पाणीपट्टीची सुद्धा अन्यायकारक वसुली सुरू असल्याने तातडीने घरपट्टी पाणीपट्टी कमी करा अन्यथा.. प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने नगरपालिकेच्या विरोधात जनआंदोलन उभारावे लागणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख आप्पासाहेब ढूस यांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ढूस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मालमत्ता कराच्या बिलाबाबत आपण पत्राद्वारे जी माहिती दिली आहे त्यामध्ये प्यारा क्रमांक दोन मध्ये चतुर्थ वार्षिक पुनर्मूल्यांकन प्रस्तावित असल्याने सन २०२३-२४ चे अंतिम बिल चतुर्थी वार्षिक पुनर्मूल्यांकन नंतर देण्यात येईल असा शिक्का मारून बिले वाटप करण्यात आले आहे असे आपण म्हटले आहे. तथापी मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे पत्रानुसार व ३१ डिसेंबर २०२३ ला पुनर्मूल्यांकन पूर्ण झाले असेही आपण २९.१०.२०२४ अन्वये जिल्हाधिकारी यांना कळविले असताना ०१ जानेवारी ते ३१ मार्च पर्यंत आपण बिलावर मारलेल्या शिक्यांनूसार उर्वरित बाकी वसुली करणे क्रमप्राप्त होते,मात्र, तसे न करता आपण २०२४- २५ च्या बिलात मागील थकबाकी सदरी रक्कम दाखवून घरपट्टीची बिले वाटप केलेले आहेत.

तसेच अशा पद्धतीने शिक्के मारून बिले वाटप करण्याची कायद्यात तरतूद नाही,आणि कलम १५० (क) हा नवीन मालमत्तेच्या कर आकारणी संदर्भात असून त्याचा या कर आकारणीशी काही एक संबंध नाही. त्यामुळे आपण दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे सबब झालेले पुनर्मूल्यांकन बेकायदेशीर झाले असल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना ते मान्य नाही व ते तात्काळ रद्द करण्यात येऊन मागील सन २०२२-२३ च्या आकारणी प्रमाणेच मालमत्ता करायची बिले सर्व नागरिकांना देण्यात यावीत.

तसेच देवळाली प्रवरानगर परिषदेने नागरिकांसाठी आठवड्यातील एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस पिण्याचे पाणी येथील नागरिकांना देण्यात येत नाही.

अशा पद्धतीने वर्षातील एकूण ४८ दिवस पाणी कपात केली जात असल्याने या कपात कालावधी मधील पाणीपट्टी नागरिकांकडून आकारणी करणे अन्यायकारक आहे त्यामुळे १८०० रुपये वार्षिक पाणीपट्टीच्या हिशोबाने पाणी बंद कालावधीतील ४८ दिवसांचे एकूण २४० रुपये पाणीपट्टी वार्षिक पाणीपट्टीच्या बिलातून कमी करण्यात यावी.. व, त्या पद्धतीने सुधारित पाणीपट्टी मागणीची बिले नागरिकांना देण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेची अन्यायकारक वाढ केलेली घरपट्टी व पाणीपट्टी तात्काळ कमी करण्यात यावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने सनदशीर मार्गाने या विरोधात जन आंदोलन हाती घेण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे, 

वरील सर्व गोष्टींचा समावेश करून त्या आशयाचे पत्र देवळाली प्रवरा नगरपालिकेला देण्यात आले आहे व त्याची प्रत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू आणि अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे