सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील विद्यालय तसेच महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थी युवक युवती यांना बारामती-सुपा व निरा-बारामती या मार्गावरील बस वेळेवर ये जा होत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती,
हे निदर्शनास आल्यानंतर ही गैरसोय टाळण्यासाठी बारामती तालुका युवती अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कु.प्रियांका शेंडकर आणि महाविद्यालयीन युवती यांनी आगारातून बस वेळेवर सुटाव्यात अशा आशयाच्या मागणीचे लेखी निवेदन बारामती च्या आगार प्रमुख वृषाली तांबे यांना दिले.

यावेळी तत्परतेने वृषाली तांबे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत यापुढे बस वेळेवरच सुटतील व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा