
बारामती : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ २०२४-२५ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मा.श्री. जवाहर शाह (वाघोलीकर)अध्यक्ष,अनेकान्त एज्युकेशन सोसायटी हे यावेळी प्रमुख उपस्थितीत होते, कार्यक्रमाची सुरुवात मा.प्रा.डॉ. संजय ढोले विज्ञान कथा लेखक, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व विद्यापरिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

मा.श्री. मिलिंद शाह (वाघोलीकर) सचिव,अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामती, व मा.श्री. विकास शहा (लेंगरेकर) खजिनदार, अनेकान्त एज्युकेशन सोसायटी,बारामती हे सन्माननीय उपस्थितीत होते.

दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत दि. ०१ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान ग्रंथालय विभागातर्फे पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धे अंतर्गत ग्रंथालय विभागात विद्यार्थी गटातून बारा व प्राध्यापक गटातून तेरा असे एकूण पंचवीस पुस्तक परीक्षणे प्राप्त झाली होती.
या स्पर्धेतील गुणानुक्रमे तीन क्रमांक पुढीलप्रमाणे
विद्यार्थी गट :
१) कु. ज्ञानेश्वरी राजेंद्र फडतरे (एम.एस्सी – 1 फिजिक्स)
२) श्री. स्वप्नील नंदकुमार गोंजारी (एम.ए.- II राज्यशास्त्र)
३) श्री. ऋषीकेश गौतम जगताप (एम.ए.- II राज्यशास्त्र)
प्राध्यापक गट :-
१) प्रा. शोभा भिमाप्पा कानडे
२) डॉ. सुनील काशिनाथ खामगळ
३) डॉ. मेघा राजेश बडवे
तसेच महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी ऋषिकेश गौतम जगताप एम. ए. भाग-II याने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये अनेकांत नियतकालिकासाठी लेख पाठविला होता. हा लेख अनेकांत नियतकालिका मध्ये छापण्यात आला होता. तसेच मराठी मध्ये त्याने उत्कृष्ट लिखाण केल्याबदल त्याचा या वर्षाच्या ‘वार्षिक गुणवत्ता पारितोषिक’ कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

अनेकांत नियतकालिका २०२४ मध्ये उत्कृष्ट हिंदी लेखासाठी स्वप्निल गावडे यांचा तर अनेकांत नियतकालिका २०२४ उत्कृष्ट इंग्रजी लेखासाठी संचित सेजल यांचाही गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी नियतकालिका लेखात मिळवलेल्या प्राविण्याबद्दल त्यांचे प्राचार्य मा.डॉ. अविनाश जगताप सर, मा.उपप्राचार्य डॉ. अशोक काळेगे सर,मा. उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर सर, मा. उपप्राचार्य डॉ. योगिनी मुळे, मा. रजिस्ट्रार, राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. हनुमंत फाटक, प्रा. राजू पांडे, डॉ. कैलाश मांटे, प्रा.गणेश पोमणे यांचे तर्फे अभिनंदन करण्यात आले.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा