Breaking
अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

काढाल बुलेटचा कर्कश ‘फटाका’ तर भेटेल बारामती वाहतूक शाखेचा झटका- बारामती वाहतूक शाखा आक्रमक,

बारामती शहरात बेशिस्तपणे दुचाकी व चार चाकी चालवत असाल तर बारामती वाहतूक शाखेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे  बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत यादव यांचा कडक इशारा.

0 1 4 5 6 9

कारवाई दरम्यान जप्ती मोहिमेत बुलेट गाड्यांचे १३ सायलेंसर जप्त

बारामती : वाहतूक शाखेने स्वच्छ,सुंदर,हरित,असलेल्या बारामती शहरात आता ‘शांतता व सुव्यवस्था’ राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.कर्ण कर्कश आणि मोठा फटाका आवाज काढत असलेल्या बुलेट ताब्यात घेत त्यांचे सायलेंसर जाग्यावरच काढून कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसात सुमारे १३ गाड्यांचे सायलेंसर जमा करून वाहतूक शाखेने समुपदेशनासह दंडात्मक कारवाई केली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून बारामती शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीला शिस्त लावली आहे व अजुनही शिस्त प्रिय वाहतूक साठी प्रयत्नशील आहेत. शहरात आतापर्यंत अनेक दंडात्मक कारवाया करत बेशिस्त वाहनचालकांचे मन परिवर्तन केले आहे. मात्र एवढे करूनही कायद्याचे आणि शिस्तीचे भान नसलेल्या टुकारांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांना परिश्रम घ्यावे लागत आहे.

सध्या शहरातील वेगवेगळ्या भागात आणि महाविद्यालय परिसरात तरुणांकडे तसेच धनदांडग्या लोकांकडे बुलेट गाड्या वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र या कंपनीने दिलेल्या गाड्यांमध्ये मनाप्रमाणे हवा तसा बदल करून या गाड्या ‘मॉडिफाय’ करण्याकडे टुकार तरुणांना रस आहे.

गाड्यांमध्ये बदल करून तरुण-तरुणींचे तसेच इतर लोकांचे लक्ष आकर्षित करण्याची जणू काही स्पर्धा निर्माण झालेली आहे.

त्यामुळे कंपनीचे सायलेंसर काढून त्या जागी फटाका सायलेंसर बसवून ही वाहने शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठा आवाज काढत फिरतात. याचा नाहक त्रास लहान मुले, वयोवृद्ध, मुली, आजारी रुग्णांना होतो. याबाबत वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत,व प्रबोधनही केलेले आहे तरीही काही टुकार लोक दंड किंवा मार्गदर्शन करूनही सुधारण्याच्या मानसिकतेत नाहीत, त्यांच्यावर कसलाही फरक पडत नाही. 

त्यामुळे अशा टूकारांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेने वेगळीच मोहीम हाती घेतली आहे. बारामती शहरातल्या चौका चौकात नाकाबंदी करून अशा बुलेटचे सायलेंसर जाग्यावरच काढून घेऊन किंवा ही वाहने थेट वाहतूक शाखेच्या दालनात नेऊन त्यांचे सायलेंसर काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

विशेष म्हणजे जोपर्यंत काढलेल्या फटाका सायलेंसरच्या जागी दुसरा विना आवाजाचा किंवा कंपनीच्या नियमानुसार असणारा सायलेंसर जोपर्यंत बसवला जात नाही तोपर्यंत अशी वाहने ताब्यात दिली जात नाहीत.

सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक, श्री.पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक, श्री.गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलीस जवान सुधाकर जाधव, रेश्मा काळे, प्रदीप काळे, स्वाती काजळे, योगेश कातवारे, व जलद कृती दलाचे जवान अशोक मोरे, शिवाजी बरकडे,योगेश पळसे, अजय आहेर,हैदर जमादार,सुदर्शन कदम, सुभाष डोंबाळे,अजिंक्य कदम, सुभाष काळे,अशोक झगडे,प्रिया पावडे, प्रियांका पोफळे, श्रद्धा थोरात, यांनी केली आहे. 

ही मोहीम यापुढेही चालू ठेवण्यात येणार आहे.

‘वाहतूक शाखेकडून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत वारंवार आवाहन केले जाते. प्रसंगी दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र तरीही काही बेशिस्त दुचाकी चालकांकडून नियमांची पायमल्ली केली जाते ही दुर्दैवी बाब आहे. परंतु आता नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक मोहीम राबवली जाणार आहे. फटाका सायलेंसर लावून कुणी फिरताना दिसला तर किंवा त्रास देत असेल तर +919923630652 या क्रमांकावर संपर्क करा.गाडीचा नंबर कळवा. माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन

श्री.चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, बारामती वाहतूक शाखा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे