बारामती: विधानसभेच्या अनुषंगाने मातंग समाजातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते साधू बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध ठिकाणी मातंग समाजाच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.तालुक्यातील मातंग समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षमपणाने नेहमीच बारामती तालुक्याचे विद्यमान आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण न करता मातंग समाजासाठी व समाजातील तरुणांना बळ देण्याचे काम केले आहे.
समाजाने आपापसातील गटबाजी बाजूला ठेवून मातंग समाजाच्या हक्कासाठी व हक्काचा आमदार म्हणून आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला तालुक्यातून अजित दादा पवार यांना प्रचंड मताने निवडून द्यायचे आहे असे सांगितले.

महायुतीच्या काळामध्ये समाजासाठी त्यांचे हक्क व अधिकार मिळावेत व समाजाने स्वाभिमानाने जगावे याकरता महायुती प्रयत्न करताना दिसत आहे.
मातंग समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रश्न सोडवण्यासाठी व त्या दृष्टीने नवनवीन योजनांसाठी महायुती सरकारने पुढाकार घेतलेले आहे.
मातंग समाज तसा रांगडा आहे परंतु उच्चशिक्षित नाही पण प्रामाणिक आहे या साठी समाजातील तरुण-तरुणींसाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात तसेच आपला आर्थिक विकास करता यावा यासाठी नुकतीच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी – ARTI) ची स्थापना केली आहे मंत्रिमंडळाच्या दि.११.०७.२०२४ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाज तसेच त्याच्या उपजाती (मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा या समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टी या संस्थेची स्थापना करण्यास महायुतीच्या सरकारने मान्यता दिली आहे.
या माध्यमातून समाजातील शिक्षक मुलांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.

मागील कित्येक वर्षात आपल्या समाजाचा विधान परिषदेवर सदस्य म्हणून कोणीही व्यक्ती नव्हता ते काम महायुती सरकारने श्री अमितजी गोरखे यांचा आपला समाजातील एक प्रतिनिधी म्हणून नुकतीच विधान परिषदेवर निवड केली आहे. ही गोष्ट आपल्या समाजासाठी खूप अभिमानास्पद आहे.

आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत मोठे नेते म्हणवणारे यांनी समाजातील घटकांसाठी कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाही फक्त समाजाचा मतदाना पुरता वापर करून घेतला आहे.त्यातली त्यात मातंग समाजातील युवकांसाठी युवती व महिलांसाठी रोजगाराच्या संधी मतदारसंघात आणल्या नाहीत किंवा तसे प्रयत्नही झालेले नाहीत.

या व अशा लोकांना इथून पुढे आपण आपल्या मतदानातून उत्तर देण्यासाठी तयार असले पाहिजे असे श्री.साधू बल्लाळ यांनी बोलताना सांगितले,
बारामती तालुक्यातील पूर्ण मातंग समाज हा अजित पवारांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणार असल्याचे साधू बल्लाळ यांनी यावेळी सांगितले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा