बारामती : दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ५४ मिनिटांच्या दरम्यान फिर्यादी उमेश लक्ष्मण ताम्हाणे रा.जळगाव कप ता.बारामती हे त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत उभे असताना त्यांचे चुलते रामदास जयवंत ताम्हाणे हे बारामती मोरगाव रोडने रोडच्या डाव्या बाजूने पायी चालत घराकडे येताना त्यांना दिसले त्याच दरम्यान मोरगांव बाजूकडून एक पिवळ्या रंगाचा डंपर भरधव वेगात बारामती बाजूकडे गेला व पुढे स्पीड ब्रेकरजवळ डंपरने रोडच्या एका बाजूने पायी चालत येणारे त्यांचे चुलते यांना डंपर ची धडक बसून अपघात झाला,

अपघातानंतर अपघात केलेला डंपर हा तेथे न थांबता बारामती बाजूकडे निघून गेला,आजूबाजूचे इतर काही लोकांनी अपघात ठिकाणी जावून पाहिले असता रामदास जयवंत ताम्हाणे हे अपघातात गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले होते,

त्यानंतर गावातील काही लोकांनी अपघात केलेल्या डंपरचा पाठलाग करून त्यास क-हावागज गावच्या हद्दीत पकडले.
डपंर क्रमांक MH42 T 0329 व त्यावर चालक असणारा व्यक्ती नाव हिरामल श्रावणा बाबर रा.आदर्शनगर ता. बारामती जि. पुणे असे असल्याचे समजले

सदर अपघातास कारणीभुत डंपर क्रमांक MH42 T 0329 वरील चालक नाव हिरामल श्रावणा बाबर याचेवर अपघातास कारणीभूत झाल्याने फिर्यादी उमेश लक्ष्मण ताम्हाणे रा.जळगाव कप ता.बारामती जि पुणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
माळेगांव पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहा.फौजदार श्री.वाघ व अंमलदार, पोलीस हवालदार श्री.वायसे पुढील तपास करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा