बारामती: हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून तसेच संवेदनशील, कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख श्री.मंगेश चिवटे, कार्याध्यक्ष श्री.रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच नवीन राज्य कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत राज्यातील विविध भागातील पदाधिकारी तसेच सदस्य यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. त्यात इंदापूरच्या सौ.सीमा कल्याणकर यांची राज्य कार्यकारिणीत सदस्य पदी निवड करण्यात आली.

तसेच भिगवण ता.इंदापुर येथील श्री.भूषण सुर्वे यांची (सोशल मीडिया सदस्य ) पदी निवड करण्यात आली.

शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष श्री.रामहरी राऊत यांनी दोघांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे. या निवडीमुळे इंदापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे त्यामुळे येथे मोठा जल्लोष करण्यात आला.

सौ.सीमा कल्याणकर या विकासधारा मंच च्या संस्थापिका असून त्यांनी शेतकरी, युवक, युवती यांच्या सक्षमीकरणासाठी मोठे कार्य केले आहे व यात त्यांचे अनमोल योगदान आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनवलेल्या पदार्थाना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले असून या माध्यमातून महिलांना उद्योजिका बनविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत व त्याठी त्या नेहमी आग्रही असतात.

श्री.भूषण सुर्वे यांनी रक्तदान शिबीर तसेच वैद्यकिय कक्षाच्या माध्यमातून हजारो लोकांना वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत व परिसरातील गोरगरीब व गरजू रुग्णांना मदत मिळून दिली आहे व काही रुग्णांना जीवदान दिले आहे.

रक्तदानाचे त्यांचे कार्य अनेक जिल्ह्यात सुरू असून अनेक रक्तपेढीशी ते जोडले गेलेले आहेत. कोरोना साथीच्या काळात त्यांनी लक्षवेधी कार्य करून हजारो नागरिकांना जीवनदान दिले आहे.
कक्षाच्या वरिष्ठ मान्यवरांनी ठेवलेल्या विश्वासास सदैव पात्र राहून महाराष्ट्र राज्यात इंदापूर तालुक्याचा नावलौकिक उंचावण्यासाठी कटिबध्द राहू असा विश्वास सौ.कल्याणकर व श्री भूषण सुर्वे यांनी व्यक्त केला.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा