Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती तालुक्यातील या गावातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज.

तालुक्यातील पाहिला तीन मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित

0 1 4 5 6 9

बारामती : मुरुम ता.बारामती येथे मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत ३ मेगावॅटचा सौर प्रकल्प गुरुवार दि.१९/१२/२०२४ पासून कार्यान्वित झाला.

तालुक्यातील हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.या सोलर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास शेतीपंपासाठी थ्रीफेज वीज पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे.

सोमेश्वर उपविभागाआंतर्गत येणाऱ्या मुरुम, वाणेवाडी, वाघळवाडी, करंजेपूल, सोरटेवाडी, मळशी व वायाळपट्टा या गावांतील अकरा केव्हीच्या सर्व फिडरला दररोज दिवसा आठ तास थ्री फेज वीजपुरवठा मिळणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचा रात्री शेतात जाण्याचा त्रास वाचणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या योजनेअंतर्गत मुरुम ग्रामपंचायतला तीन वर्षांसाठी प्रति वर्षे पाच लाख रुपये प्रमाणे १५ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार असून ग्रामपंचायतीला या निधीतून गावातील अपारंपारिक ऊर्जेची कामे करावी लागणार आहेत.

मुरुम ग्रामपंचायतने या योजनेसाठी अकरा एकर गायरान जागा ग्रामपंचायत ठराव करून उपलब्ध करून दिल्याने हा प्रकल्प मार्गी लागला असल्याची माहिती या प्रकल्पाचे समन्वयक आणि भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश जगताप यांनी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे सन २०१९ मध्ये या योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

ग्रामपंचायत जागा, विविध प्रकारच्या परवानग्या, रस्ता, पाणी, पत्रव्यवहार आदी प्रक्रिया पूर्ण करून तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या नेत्यांच्या सहकाऱ्याने हा प्रकल्प सुरु करण्यास यश मिळाले असल्याची माहिती प्रकाश जगताप यांनी दिली.

त्याचबरोबर महावितरणचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे व अरविंद अंभोरे, सहाय्यक अभियंता प्रजेश जाधव व संदीप जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश लकडे यांचेही सहकार्य मिळाले. सोलर प्रोजेक्टमध्ये असणारे विद्युत खांब व डीपी शिफ्ट करणे, सात किलोमीटर अकरा केव्हीची लाईन ओढणे, शेतकऱ्यांशी चर्चा करून हा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित झाला आहे.

यासाठी ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले.

आवादा ग्रीन एनर्जी प्रा. लि. या कंपनीने हे काम पूर्ण केले आहे. बारामती तालुक्यातील मुरुम याठिकाणी ३ तर काळखैरेवाडी या ठिकाणी ४ मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे यातील मुरुमचा प्रकल्प गुरुवारपासून कार्यान्वित झाला. मुरुम येथून जवळच असलेल्या ३३/११ केव्ही सोमेश्वर उपकेंद्रास ही वीज जोडण्यात आली आहे.

कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे क्रांतिकारी अभियान २०२५ अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.०  ही योजना राज्य सरकारने सुरु केली असून या योजनेला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या योजनेमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळणार असून रोजगार निर्मिती होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे