
बारामती : ऑगस्ट २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान जवळपास आठ महिन्यांमध्ये एका ३८ वर्ष वयाच्या महिलेने सुमारे साडेचार लाख रुपये खंडणी रुपाने घेतले अशा स्वरूपाची तक्रार बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की गणेश सर्जेराव पवार रा.प्रगतीनगर तांदुळवाडी रोड बारामती, ता.बारामती जि पुणे मुळ रहाणार एरंडोली ता.श्रीगोदा जि.अहिल्यानगर यांना बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करते अशी धमकी देवुन व वेळोवेळी बॅल्कमेल करुन माझ्याकडे खंडणीची मागणी करुन रोख रक्कम रुपये २,८१,६००/- दोन लाख एक्यांऐशी हजार सहाशे रुपये आणि एक डायमंडचे मंगळसुत्र ज्याची किमंत सुमारे १,६८,००० रुपये, असे सुमारे साडेचार लाख रुपये खंडणी रुपाने घेतले आहेत अशी तक्रार पवार यांनी बारामती पोलिसांत दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेतील महिलेचे नाव सविता विजय नायकुडे वय ३८ रा. मळद, ता.बारामती जि.पुणे मुळ रहाणार मु. पो. आझादपुर,ता.कोरेगाव, जि.सातारा असे आहे
पुढील तपास बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार,पो.हवा,श्री.खाडे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा