अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
गंभीर गुन्हे दाखल असलेले माळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील तीन गावगुंड तडीपार,गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी कारवाई
गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा बसावा व त्यांच्यावर कायद्याचा धाक रहावा यासाठी पोलीसांचा आक्रमक पवित्रा

0
1
4
5
6
9
बारामती : तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात नागरीकांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन नागरीकांना मारहाण करणे, घातक शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे, नागरीकांना जबर दुखापत करणे तसेच शालेय विद्यार्थिनी व महिलांची छेडछाड करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील कांबळेश्वर ता. बारामती जि.पुणे या गावातील सुरज पांडुरंग जाधव, वय-२५ वर्षे, चेतन पांडुरंग जाधव, वय-२४ वर्षे व अर्जुन बाळासो आडके, वय-२२ वर्षे रा. सर्व कांबळेश्वर, ता. बारामती जि. पुणे यांचेमुळे सर्वसामान्य लोक, शालेय विद्यार्थी, मजुर व नोकरदार वर्ग यांच्यात त्यांच्याबद्दल भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची माहीती मिळाल्याने अशा स्वरुपाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा बसावा व त्यांच्यावर कायद्याचा धाक राहणे आवश्यक असल्याने त्यांना संपुर्ण पुणे ग्रामीण जिल्हयातुन तडीपार करावे या करीता माळेगाव पोलीस ठाणे कडून वरील नमुद इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये मा. पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.
सदर तडीपार प्रस्तावाची मा. पोलीस अधीक्षक सो. पुणे ग्रामीण यांनी सखोल चौकशी करुन वरील नमुद इसमांना संपुर्ण पुणे जिल्हा हद्दीमधून (पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालयासह) ०१ वर्षे कालावधी करीता तडीपार करण्याचे आदेश दिल्याने त्यांना पुणे जिल्हयातून ०१ वर्षे कालावधी करीता तडीपार करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. पंकज देशमुख सारे, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा.श्री. गणेश बिरादार सो. अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. डॉ. श्री. सुदर्शन राठोड सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. श्री. अविनाश शिळीमकर सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. श्री. सचिन लोखंडे, प्रतिबंधक कारवाई विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. तुषार भोर, पो.कॉ.श्री. जालिंदर बंडगर यांनी केलेली आहे.
याकामी त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचेकडील स. फौ. श्री. महेश बनकर, पो.हवा. श्री. रामदास बाबर यांचे सहकार्य लाभलेले आहे.