Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

महा किड्सने विविध स्पर्धा परीक्षा राबवाव्यात – माजी आमदार राम सातपुते

0 1 4 5 6 9

बारामती : ग्रामीण भागातील आणि माळशिरस तालुक्यातील पाहिली शाळा म्हणून महा किड्स सी. बी. एस. ई. स्कुलचा आवर्जून उल्लेख होतो या स्कुलने वेळोवेळी विविध स्पर्धा परीक्षा राबवाव्यात, जेणेकरून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून मोठे अधिकारी घडविण्यास मोलाची मदत होणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राम सातपुते यांनी केले. 

महा किड्स सी. बी. एस. ई. स्कुल नातेपुते या शाळेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार राम सातपुते यांना भूषविण्यात आले होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणातून मा. आमदार सातपुते हे बोलत होते.

ते पुढे म्हणाले सोलापूर जिल्ह्यात  विद्यार्थ्यांना मल्लखांब  प्रशिक्षण देणारी महा किड्स सी. बी. एस. ई. ही एकमेव संस्था आहे. मल्लखांब खेळामुळे अनेक मुले तल्लख आणि चपळ बनतात, पालकांनी देखील पूर्ण ताकतीने आपल्या मुलांना घडवावे, मुलेच संस्थेचा आणि पालकांचा नावलौकिक वाढवतीलं. अँड. शिवशंकर पांढरे मुलांसाठी अविरत झटत असतात त्यांना सर्वांनी सहकार्य करावे. तसेच संस्थेस कसलीही मदत लागल्यास आंम्ही निश्चितच करू असे आश्वासन देखील मा. आमदार राम सातपुते यांनी दिले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे, समता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड.बी वाय.राऊत पांढरे उद्योगसमूहाचे मालक राजेंद्र पांढरे संस्थेचे चेअरमन तेजस्विनी पांढरे, सचिव अलका पांढरे, निशाताई सरगर, सिताराम पांढरे, डॉ. सतीश झंजे, मेजर सुरेश पांढरे,संदिप कदम, अमोल शिंदे आरुष गांधी संदीप जाधव यांसह  इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे