Breaking
अपघातकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगांव निंबाळकरची केळी आखाती देशात निर्यात.

ऊसाला सक्षम पर्याय म्हणून केळीची लागवड, श्री.राजकुमार शहा, प्रगतशील व आदर्श शेतकरी वडगांव निंबाळकर व त्यांच्या कुटुंबांनी पिकवलेली केळी आखाती देशात निर्यात केली जात आहेत.

0 1 4 5 6 9

बारामती : वडगाव निंबाळकर ता,बारामती येथील आदर्श शेतकरी राजकुमार चंदुलाल शहा यांनी आपल्या शेतात पिकवलेली केळी आखाती देशात, सौदी अरेबियात निर्यात केली आहे. पारंपारिक ऊस पिकाला सक्षम पर्याय म्हणून केळीची लागवड सरस ठरत आहे.

शहा कुटुंबीय आधुनिक व शास्त्रोक्त पध्दतीचा वापर करून अगदी नियोजनबद्ध पद्धतीने शेती करत आहेत यामुळे राजकुमार शहा यांना शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या शेतात पारंपारिक पद्धतीने ऊस पिक न घेता केळी लागवड करण्याचा निर्णय शहा यांनी घेतला, यासाठी विविध ठिकाणी जाऊन केळी पिकाचा त्यांनी अभ्यास केला तेथील शेतकऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर आपल्या शेतातील माती आणि हवामानाचा अंदाज घेऊन दोन प्रकारच्या केळी रोपांची लागवड केली आहे.

देशी केळी (यलक्की) या वाणाची रोपे ३ एकरावर तर ४ एकर क्षेत्रावर जिनाईन या वाणाची केळी रोपे लावली आहेत. दोन्ही वानाची रोपे पुणे जवळील थेऊर येथिल रोपवाटिकेतून मार्च २०२४ मध्ये खरेदी केली. 

केळी लागवड करायच्या क्षेत्रात ऊस तोडीनंतर नंतर पाचट कुट्टी गाडली यावर मळी राख शेणखत टाकुन नांगरटी केल्या त्यानंतर सरी पाडल्या जिनाईन दोन सरीतले अंतर ६ फुट रोपातलं अंतर ५ फुट देशी केळी (यलक्की) सरीतले अंतर ७ फुट रोपात ५ फुट आंतर ठेऊन रोपे लावली. ड्रिप (ठिबक सिंचन) अंथरून त्या ओलीवर ताग पेरला उगवण झाल्यावर आठ दिवसानी केळी रोपे लावली.

केळी रोपाला सावली झाली उन्हाच्या ताडाख्यापासुन बचाव करण्यासाठी ताग उपयोगी ठरला. यामुळे रोपांना थंडावा झाला.एप्रिल आखेर ताग चार फुट वाढला केळी रोपांना सुर्य प्रकाश मिळण्यासाठी ताग काढला. ताग सरीवर अंथरून त्यावर रासायनीक आणि शेणखत टाकले. शेताच्या चारही बाजुने हवा आत शिरू नये यासाठी उंच घास लावला दहा ते पंधरा फुट उंची वाढते. कडेने ताटवा झाल्याने पिकाचे संरक्षण होते.

मे सुरूवातीला वातावरणात रस सोशन करणारे किडे आसतात त्यांचा पिकाला धोका असतो पाने खोड खातात रोपे आशक्त होतात यासाठी किड्याचे रक्षण करण्यासाठी स्टिक पॅड (चिकट पडदा) एकरी सोठा दोन रंगाचे शिट लावले.

रस सोशक किडे याला चिटकतात यामुळे औषध फवारणी वाचली.

झाडाच्या वाढ आवश्यकतेनुसार औषध फवारणी आणि लागणारे अन्न द्रव्य ठिबक द्वारे दिले.पावसाचे पाणी साठुन राहणार नाही याची काळजी घेत पाण्याचा निचरा केला.सप्टेंबर पासुन केळी फळधारणा वेन चालु झाली. 

निर्यात करण्याचा दृष्टिकोन ठेऊन त्यानुसार नियोजन केले. केळी गड वाढीनुसार यावर औषध फवारणी केली.गडातील केळी फळांची संख्या नियंत्रित ठेवली एका झाडाला सुमारे दोनशे फळ ठेवली. वाढिनंतर एका फळाच वजन दिडशे ते दोनशे ग्रँम होत आहे त्यानुसार फळ ठेवली,लागवडीनंतर आठव्या महिन्यात झाडांना काठ्यांचा आधार न देता एकमेकांना पक्क्या दोरीने झाडे सैल बांधली,आकराव्या महिन्यात पहिला तोडा आला व त्यांनी व्यापाऱ्यांशी संपर्क साधला.टेंभुर्णी जि. सोलापूर येथील साई फ्रुट कंपनी कडुन त्यांना मागणी करण्यात आली.एक्सपोर्ट क्वाॅलिटीचा माल असल्याने पहिला तोडा (जिनाइन) हा दहा टनाचा निघाला व त्याची सौदी अरेबियात निर्यात झाली.

प्रति टन १८ हजार रूपये रक्कम ॲडव्हान्स दिली. एकुण १ लाख ८० हजार मिळाले या क्षेत्रातील झाडांची सुमारे दहा तोडे होतील व त्यापासून एकरी २५ ते ३० टन जिनाईन निघेल अशी अपेक्षा आहे, असे शहा यांचे म्हणणे आहे.

“यलक्की” १२ ते १५ टन निघेल. या वाणाचा पहिला तोडा चालु आठवड्यात होईल 

रिलायन्स कंपनीकडुन पिक पहाणी झाली आहे. व या केळी वाणाचा दर जास्त असतो. याला तिप्पट दर मिळतो व याची शहरी भागात जास्त मागणी असते.मार्च मध्ये रमजान महिना आहे यावेळी आखाती देशात केळीची मागणी वाढत असते याचाच अंदाज घेऊन फळांची जोपासना केली जाते.

वडगाव निंबाळकर ता बारामती केळी उत्पादक शेतकरी राजकुमार चंदुलाल शहा व त्यांच्या पत्नी सौ.संगीता शहा उपसरपंच, ग्रामपंचायत वडगांव निंबाळकर यांच्या शेतातील केळी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे