
बारामती: घरासमोरील जागेच्या मालकीवरून कुटुंबातील वाद निर्माण झाला होता. या वादाचा परिणाम म्हणून कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांना शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण देखील तोडण्यात आले.
जागेच्या वादातून चुलत सासरा व इतर चार जणांनी महिलेला शिविगाळ करुन बेदम मारहाण केल्याची घटना मुंढे वस्ती माळेगांव येथे घडली आहे.या घटनेत जखमी सुनेचे दीड लाखांचे सोन्याचे गंठण देखील तोडण्यात आहे.
ताजुद्दीन इसाक मुंढे,शहारुख ताजुद्दीन मुंढे,सलिम रज्जाक मुंढे, अल्ताफ रज्जाक मुंढे, मुमताज रज्जाक मुंढे सर्व जण रा.मुंढेवस्ती माळेगाव बु ता.बारामती या पाच आरोपींवर समिना अन्वर मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ही आपल्या कुटुंबासह मुंढे वस्ती माळेगांव येथे पती,सासु सासरे यांच्या सोबत रहात आहे.फिर्यादीच्या सासऱ्यांना तीन भाऊ असुन एक मयत आहे तर इतर वेगवेगळे राहतात.फिर्यादी रहात असलेल्या घरात व समोरील जागेवरून चुलत सासरे ताजुद्दीन मुंढे, रज्जाक मुंढे यांच्यात जागेच्या मालकी वरुन वाद आहे. फिर्यादी व आरोपी यांचे एकत्रित कुटुंब असताना सुपे ता.बारामती येथे एक फ्लॅट घेण्यासाठी फिर्यादीच्या सासऱ्याने पैसे दिले होते.मात्र हा प्लाट परस्पर विकला गेला.फिर्यादीचे सासरे पैसे मागायला गेल्यावर त्यांना शिवीगाळ केली गेली.
सदर आरोपी फिर्यादीला शिविगाळ करत असताना मला शिवीगाळ का करता? असे म्हटल्यावर ताजुद्दीन मुंढे यांनी कोयत्याने डाव्या हातावर वार केला.तर इतरांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.
यात फिर्यादी यांचे दीड लाखांचा सोन्याचा गंठण शाहरुख मुंढे यांनी खिशात टाकला.फिर्यादीवर बारामतीत खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
सदर घटनेचा तपास हा माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनात हवालदार श्री.अमर थोरात करीत आहेत.

कुटुंबातील वाद वाढत जाण्याची घटना समाजातील एक गंभीर समस्या आहे आणि अशा घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा