अ. नगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी: महाविकास आघाडीचे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार हेमंत ओगले यांच्या निवडणूक प्रचाराच्या नियोजनासंदर्भात राहुरी फॅक्टरी दत्त लॉन्स येथे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी राजे कदम हे होते याप्रसंगी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या बैठकीस जिल्हा बँकेचे संचालक तथा मा उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा परिषद बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, मार्केट कमिटी सभापती सुधीर नवले, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष लखन भगत, राहुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब आढाव, राहुरी मार्केट कमिटी उपसभापती गोरक्षनाथ पवार, राहूरी पंचायत समिती सभापती सुरेश निमसे, मार्केट कमिटी संचालक दत्ताभाऊ कवाणे, राहुरी मार्केट कमिटी सदस्य रखमाजी जाधव, आदी प्रमुखांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडली.

बैठकिस संबोधित करताना प्रसाद तनपुरे हे कार्यकर्त्यांना म्हणाले की हेमंत ओगले हे संपर्क असलेले सुशिक्षित उमेदवार आहे यांना आपण सर्वांना निवडून आणायचे आहे .
सोयाबीन, दूध, कपाशी बाला भाव नाही त्यामुळे सर्व ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला आणायचे आहे. हेमंत ओगले होतकरू, तरूण, सुशिक्षित आणि गेले अनेक वर्षापासून मतदार संघाच्या संपर्कात असल्याने आणि महाविकास आघाडीचे सरकार आणायचे असल्याने हेमंत ओगले यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. या ठिकाणी पार पडलेल्या या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळाला.
महाविकास आघाडीचे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार हेमंत ओगले बैठकीला संबोधीत करताना म्हणाले की, संधी दिल्यास नक्कीच मतदार संघातील सर्व मतदारांना सोबत घेऊन सर्व कामांसाठी व देवळाली प्रवरा येथे एक संपर्क कार्यालय उभारू असे आश्वासन दिले व सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
जिल्हा बँकेचे संचालक तथा मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यावेळी म्हणाले की, स्व. जयंतराव ससाणे यांच्या काळातील पुर्वाश्रमीचे चांगले दिवस आणण्यासाठी हेमंत ओगले यांना आपले मतरूपी आशीर्वाद द्या. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यावेळी म्हणाले की, प्रवरा नदीतील केटीवेअर भरण्यासाठी ज्या ज्या वेळेला वसंतराव कोळसे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीने आंदोलने केली त्यावेळेस आम्ही त्यात सहभागी होऊन पाणी सोडण्यासंदर्भात प्रयत्न केले आहे. जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यावेळी म्हणाले की, या गावांचे प्रश्न वेगळे नसुन रस्ते, पाणी या संदर्भात मोठे काम करण्याची आवश्यकता असुन जी लोक आपल्यासाठी उघड भुमिका घेतात त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांनाच न्याय मिळाला पाहीजे.
दरम्यान या बैठकांसाठी बी एम पुजारी सर, दत्तात्रय आढाव लालीत चोरडीया सुनिल विश्वासराव दत्ता पाटील कडू भागवत निमसे निकम सर ज्ञानदेव वाणी सुखदेव मुसमाडे तैनुर पठाण सुरेश सेठ वाबळे दिपक त्रिभोवन आदीचे भाषणे झाली कार्यकमाचे सुत्र संचालन दादा गिरमे यानी केले


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा