
बारामती : नुकत्याच पुणे पोलीस ग्रामीण दलामध्ये पदोन्नती देण्यात आल्या यामध्ये वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील पोलिस ठाण्यात पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली. त्या निमित्ताने पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.राजकुमार डुणगे यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून सत्कार केला.
वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये पोलिस हवालदार या पदावर कार्यरत असणारे श्री.रमेश शिंदे यांची सहाय्यक फौजदार या पदावर पदोन्नती मिळाली तर श्री.जगदीश चौधर यांना पोलिस नाईक ते पोलिस हवालदार अशी पदोन्नती मिळाली.

श्री.किसन बेलदार यांची पोलिस कॉन्स्टेबल ते पोलिस हवालदार, श्री.सचिन जमदाडे यांची पोलिस कॉन्स्टेबल ते पोलिस हवालदार, तसेच ज्योती जाधव यांची पोलिस कॉन्स्टेबल ते पोलिस हवालदार या पदावर पदोन्नती मिळाली.

त्याबद्दल वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.
यावेळी डुणगे यांनी सांगितले की,
‘समाजामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे’ कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना जबाबदारीने कर्तव्य बजावावे. नेहमी सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील रहावे असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

वालचंदनगर पोलिस ठाण्यातील पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना श्री.राजकुमार डुणगे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा