फलटण : श्रीकांत शिवाजी गायकवाड रा.नरसोबानगर कोळकी, ता.फलटण, जि.सातारा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ०५/१२/२०२४ रोजी रात्री साडे अकरा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नरसोबानगर कोळकी, ता.फलटण, जि.सातारा येथून रहात्या घराच्या समोरून त्याचे मालकीची हँण्डल लाँक करुन ठेवलेली काळ्या रंगाची त्यावर पांढ-या रंगाचे पट्टे असलेली पॅशन प्रो मोटार सायकल,क्रमांक DL 4S BW 2921 हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीने स्वत:चे फायद्या करीता चोरुन नेली आहे.

फलटण शहर पोलीस ठाणे यांनी भा.न्या.सं.कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
तपासी अधिकारी पो.ना. पुनम तांबे फलटण शहर पोलिस ठाणे या पोलीस निरीक्षक हेमंत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा