
बारामती : वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि. नंबर ३७/२०२५ मधील घरफोडी मध्ये जप्त केलेला मुद्येमाल दागिने व रोख रक्कम एकुण २,४९,०००/- रूपये किमतीचा मुद्येमाल फिर्यादी श्री सचिन विठ्ठल करे रा.पळशी ता. बारामती यांना दिनांक ०६/०३/२०२५ रोजी पोलीस उपविभागीय कार्यालय बारामती येथे परत करण्यात आला.

मा.श्री पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, सो पुणे ग्रामीण,मा.श्री गणेश बिरादार,अपर पोलीस अधिक्षक, सो बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी सो बारामती उपविभाग, बारामती यांचे हस्ते वर नमूद केलेले रक्कम व दागिने प्रदान करण्यात आले.
वडगाव निंबाळकर पोलिसांच्या वतीने जप्त करण्यात आलेले रोख रक्कम व दागिने
फिर्यादी श्री सचिन विठ्ठल करे वय ३७ रा. पळशी ता. बारामती जि.पुणे.यांनी चोरीस गेलेला मुद्येमाल पोलीसांनी पुढाकार घेवुन कमीत कमी प्रयत्नात कोर्ट कचेरीच्या फेऱ्या न मारता ताब्यात मिळाल्याने आनंद व्यक्त करून मा.श्री पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, सो पुणे ग्रामीण. मा.श्री गणेश बिरादार,अपर पोलीस अधिक्षक, सो बारामती विभाग, व मा. श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी सो बारामती उपविभाग, बारामती यांचे आभार व्यक्त केले.
या गुन्हयाचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री.सचिन काळे व त्यांच्या सहकार्यांनी केला होता.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा