अहिल्या नगर प्रतिनिधी
राहुरी : तालुक्यातील चिंचोली फाटा परिसरातील पाटीलवाडी रोडवर दिनांक २६ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान एका तरुणाने स्वतःच्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्यातुन स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्याची घटना घडली.त्याची प्रकृती गंभीर असुन त्यास पुणे येथे पुढिल उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव येथिल जवळखे येथिल सोमनाथ वाकचौरे याने काही दिवसापुर्वी प्रेम विवाह केला.परंतू मुलीच्या घरच्यांनी तुमचा विवाह थाटा माटात करुण देणार असल्याचे सांगून मुलीस नातेवाईक घेवून गेले.तेव्हा पासुन प्रियेशी सोबत बोलणे झाले नसल्याने आज दुपारी दोन वाजता चिंचोली फाटा येथे सोमनाथ वाकचौरे याने एका जणावर गावठी पिस्तुल रोखले.परंतू मोठा जमाव जमू लागल्याने त्याच्या मनात भिती निर्माण झाल्याने त्याने स्वतः वर गोळी झाडून घेतली.

दरम्यान घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली.घटनास्थळी राहुरीचे पोलिस दाखल झाले.स्थानिकांच्या मदतीने त्या तरुणास लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आहे. तरुणाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने व त्याची प्रकृती गंभिर असल्याने त्यास पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा