बारामती : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने १ जानेवारी ते ३१ जानेवारी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महाविद्यालयामध्ये रस्ते सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे परिवहन निरीक्षक सुरज पाटील यांनी महाविद्यालयात रस्ता व सुरक्षा या विषयी मार्गदर्शन केले तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगितले. रस्त्यावर असणारे दिशादर्शक फलक, रस्त्यावरुन वाहतूक करत असताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन करत उपस्थित सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना वाहतूक नियमांची शपथ देण्यात आली.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, परिवहन अधिकारी सुरज पाटील, प्रज्ञा ओमासे, विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा समन्वयक डॉ. विलास कर्डिले, मान्यवरांचे स्वागत प्रा. महारुद्र दुधे तर सूत्रसंचालन सोमनाथ कदम यांनी केले.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा