बारामती: विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर बारामती शहर व तालुक्यातील मातंग समाजाची बैठक घेणार असल्याचे मातंग समाजाचे साधु बल्लाळ यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
बारामती तालुका व शहराच्या विकासातील एक घटक म्हणून मातंग समाजाकडे पाहिले जाते. बारामतीत कोणामुळे विकास झाला, कोण विकास करते आणि भविष्यात कोण विकास करणार या सर्व बाबी मातंग समाजासमोर ठेवण्यात येणार आहे. विकास हा कायम सुरू राहणारा मुद्दा जरी असला तरी तो विकास करून घेणारा पाहिजे त्यामुळे येणार्या विधानसभेत मातंग समाजाने विचार करून अमूल्य असे मत कोणाला द्यायचे हे सुद्धा समाजाच्या बैठकीत ठरणार आहे.

मातंग समाजाबरोबर इतर पोट जाती म्हणजे मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा या समाजांना सुद्धा बरोबर घेऊन बैठका घेण्यात येणार आहे.
मातंग समाज येणार्या विधानसभा निवडणूकीत निर्णायक ठरणार आहे. मातंग समाजाने वेळोवेळी सरकारला केलेल्या मागणीचे स्वागत करीत बार्टीच्या धर्तीवर आर्टी करून मातंग समाजासह उपजातींच्या विकासासाठी नवी संस्था करून धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
मातंग समाजाच्या कल्याणासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय कोणी घेतले, कोण घेणार याबाबतसुद्धा समाजाच्या बैठकीत सविस्तर मुद्दे मांडून निर्णय घेतला जाणार आहे.
बारामती तालुका व शहरातील गल्ली बोळात, वाड्या वस्त्यांवर जावून मातंग समाजात जनजागृती करणार असल्याचेही श्री.बल्लाळ यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा