वडगाव निंबाळकर: पोलिसांचेही मन संवेदनशील असते याचे उदाहरण नुकतेच वडगाव निंबाळकर येथील घटनेतून समोर आले,
समाजात पोलिसांकडे रक्षक म्हणून पाहिले जाते. परंतु बऱ्याचदा त्यांच्या कडक किंवा शिस्तीच्या वागण्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत काहीशी नकारात्मक भावना निर्माण झालेली असते. एखाद्याशी ते फटकून वागतात.कधी कठोर भाषेत बोलतातही पोलिसांच्या या वागणुकीमुळे कधी कधी नागरिक नाराज होतात.
खरं तर पोलिस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी असतात आणि गरजेच्या प्रसंगी इतरांना मदत करण्यासाठी असतात ,पोलीस रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित ठेवतात तर कधी उत्सवाच्या, मिरवणुकीच्या, मेळाव्याचा वेळेस पोलिसांची आवश्यकता व सेवा खूप गरजेची असते.
कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी सण, उत्सव किंवा वैयक्तिक कार्यक्रमांसाठीही वेळ नसतो. पोलीस या सर्व गोष्टींचा कधी विचार करीत नाहीत व आपली सेवा बजावत असतात.
पोलिसांच्या अशा सेवेमुळे आपले जीवन अधिक शांत आणि सुरक्षित होते. पोलीस नसते तर समाजाला क्षणभर ही सुरक्षेची भावना आली नसती.
पोलिसांमुळे असुरक्षिततेची भावना नष्ट होऊन. पोलीस आहेत, या दोन शब्दांवर आपण स्वतःला सुरक्षित समजतो. प्रत्येक परिस्थितीला पोलिस तत्परतेने तोंड देण्यास व आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत उभे असतात.
कर्माने पोलीस असलेला तो हि एक मानव आहे,कधी कर्तव्य बजावत असताना तर कधी आजारपणाने,कधी आपली सेवा पूर्ण करून निवृत्ती नंतरच्या काळात मृत्यू येणे हि कोणासाठीही न चुकणारी घटना आहे.
संकटात सापडलेल्या लोकांना जशी पोलीसांच्या मदतीची गरज असते, तशीच पोलिसांनाही जनतेच्या मदतीची गरज असते. पोलीस चांगल्या वाईट परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत असतात परंतु त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबांना एका आधाराची गरज असते सांत्वनाची गरज असते.
अशाच एका सांत्वनाची प्रचिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने करून देण्यात आली, आपल्या सोबत पोलीस दलात कर्तव्यावर असताना मृत्यू आलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना आपल्या सहकार्यांनी आपल्या सोबत राहून केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता असावी म्हणून
मा.श्री.पंकज देशमुख पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण यांच्यावतीने पोलीस दलातर्फे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्यावर असताना मरण पावलेले पोलीस अंमलदार, कै.संदीप पांडुरंग मोकाशी रा.होळ, आटफाटा तालुका बारामती जिल्हा पुणे, आणि कै.गणेश बाबासो भंडलकर रा. होळ गीतेवस्ती, तालुका बारामती. यांचे घरी जाऊन त्यांच्या कुटुंबासाठी दिवाळी सणानिमित्त भेट वस्तू ,फटाके आणि मिठाई अशी सांत्वनपर भेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

सांत्वनपर भेटीने मिळालेल्या गोष्टींबद्दल शहिदांच्या कुटुंबीयांनी तसेच घरातील सदस्यांनी मा.पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण यांचे आभार मानले व त्यांनाही दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या सहकाऱ्याविषयी व त्यांच्या कुटुंबाविषयीची संवेदनशील भावना ही आमच्यासाठी खुप सकारात्मक व प्रेरणादायी आहे असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
याप्रसंगी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी,सहाय्यक पोलीस निरीक्षक,श्री.सचिन काळे,पोलीस उपनिरीक्षक, श्री.दिलीप सुतार.पोलीस हवालदार,महेश पन्हाळे. सागर चौधरी, पोपट नाळे, हृदयनाथ देवकर हे उपस्थित होते.

मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यावतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल व दाखवण्यात आलेल्या संवेदनशीलपणाबद्दल नागरीकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा