बारामती : भारतातील पहिल्या शिक्षिका, समाजसुधारक, स्त्री-शिक्षणाच्या प्रणेत्या, विषमता- अंधश्रद्धा-अस्पृश्यता यांना कडाडून विरोध करणाऱ्या नेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज ३ जानेवारी २०२५ रोजी जयंती. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची दारे खुली केली व आज त्यांच्यामुळेच देशातील महिला विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत.
या व अशा अनेक गोष्टींची आठवण राहावी म्हणून तसेच त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा सदैव लोकांमध्ये रहावी म्हणून त्यांची जयंती देशभर साजरी केली जाते.
याच औचित्याने आज स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगांव निंबाळकर प्रशालेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रशालेतील विद्यार्थिनींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य व जनता शिक्षण संस्थेचे संचालक श्री. हेमंत तांबे होते. या कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. हेमंत बगनर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

भारतातील महिलांना शिक्षित करण्याच्या मोहिमेची सुरुवात करणाऱ्या क्रांतिकारक भारतीय स्त्रीबद्दल आणि सावित्रीबाई फुले यांचा इतिहास, सामाजिक प्रभाव आणि भारतीय शिक्षणातील त्यांचे महत्त्वाचे योगदान याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आधुनिक स्त्रीवादी आणि समाज सुधारक होत्या शिक्षण आणि साक्षरता क्षेत्रात महिलांच्या उन्नतीसाठी स्त्री शिक्षणाला पुढे नेण्याचे क्रांतिकारी ज्योत त्यांच्याकडे होती सावित्रीबाई आपले पती ज्योतिराव फुले यांच्यासह स्त्रियांना शिक्षित करण्याच्या लढ्यात सोबत होत्या क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मशाल पेटवल्याने आजच्या पिढीतील ज्या सुशिक्षित महिला आहेत त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले यांची जयंती हा एक महत्त्वाचा दिवस आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची महती खूप मोठी आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.अनिल पाटील सर, सौ.गाडे व अध्यक्षीय मनोगत प्राचार्य श्री.हेमंत तांबे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. काळे सर यांनी केले व सौ नीता मोहिते यांनी सर्व उपस्थितितांचे आभार मानले.



बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा