Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल,- पंकज देशमुख यांची पुणे येथे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून बदली

0 1 5 6 5 1

बारामती: राज्य सरकारच्या वतीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रशासनात फेरबदल केलेले आहेत. यामध्ये पोलिस आयुक्त, अप्पर पोलिस आयुक्त आणि पोलिस उप महानिरीक्षक अशा महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांमुळे राज्यातील पोलिस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांसह बदलाचे वारे वाहू लागले आहे.

येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या बदल्या करण्यात आल्या असाव्यात.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्यांपैकी कोणाची कुठे बदली झाली 

ए.एच. चावरिया यांची अमरावती शहराचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून बदली

पुणे पोलिस गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांची मुंबई गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी बदली

अनिल पारसकर यांची अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई येथे बदली झाली आहे.

एम. रामकुमार यांची संचालक, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे बदली झाली.

अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई येथे शशीकुमार मीना यांची बदली

प्रविण पाटील यांची नागपूर येथे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

संजय बी. पाटील यांची अप्पर पोलिस आयुक्त पुणे येथे बदली झाली.

वसंत परदेशी यांची अप्पर पोलीस आयुक्त, नागपूर शहर येथे बदली झाली.

एस.डी. आव्हाड यांची अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे.

एस. टी. राठोड यांचीपोलीस उप महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क येथे बदली झाली आहे.

पी.पी. शेवाळे पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथे बदली झाली.

विनिता साहु यांची अप्पर पोलीस आयुक्त, सशस्र पोलीस दल येथे बदली झाली.

प्रसाद अक्कनवरु यांची पोलीस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई बदली

अमोघ गावकर यांची पोलीस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (प्रशासन), पुणे येथे बदली

जी. श्रीधर यांची पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस दळणवळण, माहिती

तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे बदली

मोक्षदा पाटील यांची पोलीस उप महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल येथे बदली

राकेश कलासागर यांची पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई येथे बदली

प्रियंका नारनवरे यांची अप्पर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई येथे बदली

अरविंद साळवे यांची सहसंचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे बदली

सुरेश कुमार मेंगडे यांची मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई येथे बदली

धनंजय कुलकर्णी यांची अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शास्खा, बृहन्मुंबई येथे बदली

विजय मगर यांची रा. रा.पोलीस उप महानिरीक्षकपदी बदली.

राजेश बनसोडे यांची अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर येथे बदली.

विक्रम देशमाने यांची अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई येथे बदली.

राजेंद्र दाभाडे यांची अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर येथे बदली.

आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे येथे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून बदली झालेली आहे. 

त्यांच्या जागी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून पुणे शहर पोलिस दलातील उपायुक्त संदीपसिंह गिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

संदीपसिंह गिल हे पुणे शहर पोलिस दलात सध्या उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. गणेशोत्सव काळातील उल्लेखनीय काम तसेच कोयता गँगचा बंदोबस्त करण्यात गिल यांची महत्वाची भुमिका राहिली आहे. 

संदीपसिंह गिल आता पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे