
बारामती : कालच साजरा करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बारामती शहरात काही बुलेट चालक मोठ्या आवाजात बुलेट गाड्या फिरवत होते, त्यांच्यावर बारामती वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे.

त्यामध्ये काही गाड्यांचे सायलेन्सर देखील काढून घेण्यात आले आहेत, तसेच दुचाकी चालकांना दंडासह योग्य त्या सूचना करून समज देण्यात आली आहे.

यापूर्वी सुद्धा मागील वर्षभरात वेळोवेळी वाहतूक शाखेकडून बुलेट तसेच इतर मोठ्या दुचाकी चालक जे टुकारपणे वाहन चालवतात, कोणतेही वाहतुकीचे नियम न पाळता बेदरकारपणे गाडया चालवतात, ट्रिपल सीट बसून मस्ती करत गाडी चालवतात यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, व यापुढेही करणार आहोत, असे बारामती वाहतूक विभागाकडून कळवण्यात आले आहे.

बारामती वाहतूक विभागाकडून एक नम्र आवाहन करण्यात आले आहे की आपण सुज्ञ व जागरूक नागरिक म्हणून आपण आपल्या परिसरात असे जे काही बुलेट अथवा इतर मोठ्या दुचाकी अतिवेगाने,किंवा गाडीचा सायलेन्सर काढून किंवा सायलेन्सर मध्ये बदल करून, आवाज बदलून वाहन चालवतात,टुकारपणा करतात यांची नावे किंवा गाडीचा क्रमांक बारामती वाहतूक विभागाच्या 9923630652 या क्रमांकावर कॉल करून अथवा whatsapp करून कळवावा.

अशा बेजबाबदार लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक,श्री चंद्रशेखर यादव यांनी याबाबत आवाहन केले आहे. त्यांच्या 9923630652 या क्रमांकावर माहिती द्यावी असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
आपले नाव १००% गोपनीय राहील.बारामती वाहतूक शाखा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा