बारामती : मागील काही दिवसापूर्वी वढाणे तालुका बारामती येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात उत्पादन घेतलेल्या कांदा पिकाचे उत्पादन पूर्ण होऊन कांदा तयार झालेले उत्पादन, कांदा पोत्यांची चोरी करण्यात आली होती, याबाबत संबंधित शेतकऱ्याने सुपा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील वढाणे येथुन चोरीस गेलेला मुद्देमालाचा शोध घेवुन हस्तगत करण्याबाबत तसेच शेतक-यांच्या संबधित चोरी करणा-या आरोपींचा शोध घेणे बाबत मा.गणेश बिरादार अप्पर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग बारामती, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने अज्ञात आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता.

सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी श्री.मनोजकुमार नवसरे, सहायक पोलीस निरीक्षक सुपा पोलीस ठाणे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार किसन ताडगे व महादेव साळुंखे यांना गुन्हाचा सखोल तपास करून आरोपी तात्काळ अटक करून शेतक-यांचा मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या.

त्या अनुषंगाने अधिकचा तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार श्री. किसन ताडगे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे तसेच सी.टी.व्ही फुटेज, आणि तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास केला असता या गुन्ह्यात अक्षय शांताराम गायकवाड, सतिश हिरामण शिंदे, गोरख दगडु लकडे सर्व रा.वढाणे ता. बारामती जि पुणे यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना या गुन्ह्यासाठी दि. २१/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली असुन त्यांना मा.न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे.

आरोपींकडुन शेतक-याचा चोरीस गेलेला मुद्देमालात १३ पोती कांदे हस्तगत करण्यात आलेले आहेत.
पुढील तपास पोलीस हवालदार विशाल गजरे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक साो श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. गणेश बिरादार, मा.उप. विभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड यांचें मार्गदर्शनाखाली, स. पो.नि. मनोजकुमार नवसरे, पो.स.ई. जिनेश कोळी, पो.हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, पो. कॉ. सचिन दरेकर, सागर वाघमोडे, संतोष जावीर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, यांनी केलेली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा