Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

सौ.सुचिता जगन्नाथ साळवे वाघळवाडी,सोमेश्वर नगर  यांना “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार” प्रदान 

0 1 4 5 6 9

बारामती : नवक्रांती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरअरिंग अँड टेकनोलॉजी बारामती व मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार” देण्यात आला.

 

यावेळी श्री.रविकुमार घोगरे,शर्मिलाताई नलावडे, श्री. धनंजय जमादार,डॉ. सुधीर लांडे, डॉ. सुधीर आटोळे या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सौ.सुचिता साळवे या सामाजिक क्षेत्रात गेले 22 वर्ष कार्यरत आहेत.आजपर्यंत त्यांनी अनेक मुली,महिला, अपंग, वृद्ध,परित्यक्ता तसेच अनाथ मुले यांच्यासाठी खूप कार्य केली आहेत. ज्यामध्ये शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप,खाऊ वाटप किंवा शाळेत उपयोगी असणाऱ्या गोष्टी असतील किंवा विविध महापुरुषांची पुस्तक वाटप असेल अशी अनेक कार्य त्यांनी केली आहेत.

कौटुंबिक कलहामुळे वेगळी झालेली कित्येक कुटुंब त्यांनी एकत्रित करून त्यांचा संसार सुखाचा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांच्या प्रयत्नानांनी कित्येक तुटलेली नवरा बायकोची नाती पुन्हा नव्याने बहरत आहेत.काही मुली ज्या रस्ता चुकतात त्यांच्या कुटुंबातील लोकांना हतबल झाल्यासारखे वाटते अशा मुलींना त्यांनी योग्य समुपदेशन करून त्यांना देखील त्यांनी योग्य मदत केली आहे.शाळा,महाविद्यालयात अशा मुलांमुलींना व्याख्यानातून समुपदेशनाचे डोस पाजून त्यांना मुख्य प्रवाहात आणतात.

त्या महिला पोलिस दक्षता समितीमध्ये गेली वीस वर्षे काम करतात पण चुकीचे निर्णय कधीही घेतले नाहीत त्यामुळे त्यांना मानणारा पोलिस वर्ग आहे, आजही काही केसेसमधे त्यांची मदत घेतात, आज तागायत त्यांनी विनामोबदला हि सर्व कामे केली आहेत आणि करतही आहेत.त्यांना या सर्वात त्यांचे पती डॉ. जगन्नाथ साळवे उपप्राचार्य मु.सा.काकडे कॉलेज हे सर्व सहकार्य करत असतात.

समाजात एक प्रकारे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला आहे. त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे खूप आहे त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा आढावा घेऊनच त्या त्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत आणि यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

खूप लोक काम करायचे म्हणून करतात पण सौ.सुचिता साळवे म्हणजे एक पारदर्शक उदाहरण आहेत,ज्या हे सामाजिक कार्य हातात घेऊन काहींना अंधारातून प्रकाशात घेऊन जातात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे