बारामती: मा.अपर मुख्य सचिव (गृह) यांचे कडील आदेश पत्रान्वये भारतीय संसदेने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष संहिता २०२३ हे तीन नवीन कायदे पारित केले असून त्यांची अंमलबजावणी दिनांक ०१/०७/२०२४ रोजी पासून सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नवीन कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आणि जनसामान्यांना व अंमलबजावणी यंत्रणेला कायद्याची ओळख करून देण्यासाठी माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव बु।। ता.बारामती जि.पुणे या संस्थेच्या “शरद सभागृह ” येथे दिनांक ०४/०२/२०२५ रोजी कार्यशाळेचे (WorkShop) आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, नामांकित कायदेतज्ञ, सरकारी वकील आणि या विषयातील अभ्यासक यांना निमंत्रित करण्यात यावे या कार्यशाळेमध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील अंमलबजावणी घटक, महाविद्यालयीन विद्यार्थी, विधीतज्ञ, विशेष सामाजिक घटक आणि तद अनुषंगिक घटकांचा समावेश करुन नव्याने लागू करण्यात आलेल्या तीनही कायद्यांविषयी माहिती देण्यात येवून प्रसिध्दी व प्रचार करणे बाबत आदेशित करणेत आलेले होते.
या आदेशान्वये माळेगाव पोलीस स्टेशन कडून शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव बु।। ता.बारामती जि.पुणे या शिक्षण संस्था अंतर्गत पदविका व पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे एकुण ०६ विभागातील विद्यार्थी,विद्यार्थिनी तसेच सर्व विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक,संस्थेचे सचिव मा.डाॅ.श्री .धनंजय ठोंबरे, विश्वस्त मा.श्री.वसंतराव तावरे, मा.श्री.थोरात, यांचे उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ॲड श्री.शामराव बाजीराव कोकरे यांनी भारतीय संसदेने पारीत केल्यानंतर दिनांक ०१/०७/२०२४ रोजी पासून संपुर्ण भारत देशात लागु झालेल्या भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्ष संहिता २०२३ या कायदा मधील तरतुदी तसेच शिक्षा इ. बाबतची माहीतीपर मार्गदर्शन / व्याख्यान उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दरम्यान ॲड श्री. कोकरे यांच्या मनोगता नंतर माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री.सचिन लोखंडे यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट इ. समाज माध्यमांचा चुकीचा वापर व त्यामधुन घडणारी अल्पवयीन गुन्हेगारी, शालेय शिस्त इत्यादी विषयांसंदर्भाने उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता.




बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा