बारामती: वडगांव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर १ (मुलांची) येथे दिनांक ०७/१२/२०२४ रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या पालक सभेमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास,विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि उपस्थिती,मूल्यसंस्कार,शिस्त,चांगल्या सवयी,शालेय भौतिक सोयीसुविधा,आनंद बाजार,शैक्षणिक सहल,वार्षिक स्नेहसंमेलन आदी विषयांवर सखोल आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली.

शाळेच्या विकासासाठी पालकांनी आपली मनोगते दिलखुलासपणे व्यक्त केली.शाळेतील शिक्षकांनी पालकांच्या सुयोग्य सूचनांचा आदर करून अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.
विविध नवोपक्रमामुळे शाळेचा पट दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकांनी शाळेचे कौतुक केले.सदर पालकसभेचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या यशवंतराव कला,क्रीडा महोत्सवांतर्गत स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.

यामध्ये निरंजन अनिल खुडे,आर्यन सागर गवळी,रुद्र अनिल खोमणे,सिद्दिक इरफान बागवान,शौर्य प्रशांत आगम,संविधान अमित साळवे,राजवीर आनंदा खोमणे,शिवम रुदाल मौर्या,युगांत गिरीष राजेनिंबाळकर,आयुष लक्ष्मण चव्हाण वेदांत सागर फुले आदी मुलांनी बक्षिसे पटकावली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल जाधव,उपाध्यक्ष सुशिलकुमार अडागळे,मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,उपशिक्षक अनिल गवळी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य समीर आतार,स्वप्निल शिंदे,मोहिनी दीक्षित,मोहिनी साळवे,शुभांगी साळवे,पल्लवी आगम,रुपाली जाधव,किरण चव्हाण रणजीत बोडरे,अनिल खुडे,फारूक शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा