
बारामती : जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड येथे कैलास बोराडे यांना झालेल्या अमानुष मारहाण व गरम सळईने चटके दिल्याच्या घटने प्रकरणी माळेगाव बुद्रुक, ता. बारामती येथील संतप्त झालेल्या ओबीसी समाजाच्या वतीने माळेगाव पोलीस ठाण्याला आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

माळेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांना निवेदन देऊन,या घटनेबद्दल बोराडे यांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी सागर मोटे, संदीप आढाव, अक्षय(बाबू) वाघमोडे, ज्ञानेश तांबे, केशव भोसले, महेश लकडे, मयूर गव्हाणे, ऋषी गोफणे, पिनू खरात, सागर बनसोडे, कुणाल सकट, निहाल भोसले, अमोल जगताप, राहुल भोसले इत्यादी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा