अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
राहुरीत चक्क पोलिस अधीक्षकांना वाहतुक नियमन करताना पाहिले, – पोलिस अधीक्षकांच्या तत्परतेचे होतेय कौतुक

0
1
5
2
4
7
आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी : पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी सहजासहजी रस्त्यावर दिसत नाही आणि दिसलास तर काहीतरी गंभीर विषय नक्कीच असतो परंतु राहुरी फॅक्टरी आंबेडकर चौकात आणि नगर मनमाड राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक राकेश ओला हे अहिल्यानगरहून शिर्डीकडे जात असताना राहुरी फॅक्टरी येथे वाहतूक कोंडीत सापडले,
वाहतूक कोंडीत स्वतः अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक अडकल्याने स्वतः गाडीच्या खाली उतरून वाहतूक सुरळीत करत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला.
चक्क पोलीस अधीक्षकाने गाडीच्या खाली उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थित नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले.
आज शनिवार व उद्या रविवार सुट्टया आल्याने शिर्डी व शनि शिंगणापूर देवस्थानकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी रेलचेल वाढल्याचे अचानक राज्य महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला,
अहिल्यानगर कडून शिर्डी कडे जात असलेले आहिल्यनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना या वाहतुकीचा प्रत्यय आला. व वाहतूक ठप्प झाल्याचे पाहताच स्वतः पोलीस अधीक्षक यांनी आपल्या गाडीच्या खाली उतरून वाहतूक सुरळीत करण्याचे आपले पोलीस खाकीचे कर्तव्य बजावले.
पोलीस अधीक्षक वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे फौज फाट्यासह राहुरी फॅक्टरी येथील आंबेडकर चौकात हजर झाले.
वाहतूक सुरळीत करण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते मात्र चक्क पोलीस अधीक्षकांनी वाहतूक सुरळीत केल्याने उपस्थितांमध्ये पोलीस अधीक्षकांच्या कर्तव्याचे नागरिकांना कौतुक वाटले.
गरजेच्या ठिकाणी पोलीसच उभा राहतो याचा आज प्रत्यय राहुरीकरांना आला.