
बारामती : शासकीय परिपत्रकानुसार १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२५ या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेस मिळालेल्या अभिजात दर्जाबाबत मराठी विषय शिक्षक श्री.अनिल पाटील सर यांनी मराठी भाषेविषयी महत्त्व सांगितले.
प्रशालेत प्रभात फेरी घेऊन घोषवाक्यांद्वारे घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. मराठी आमुची मायबोली या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. मराठी आमची मातृभाषा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांकडून कविता लेखन स्पर्धा,रांगोळी, शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा असे विविध उपक्रम घेण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल गोडवा निर्माण करण्यात आला.अनेक साहित्यकार लेखक, कवी यांची माहिती देण्यात आली. प्रशालेचे सर्वच विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. पर्यवेक्षक श्री बगनर सर, प्राचार्य श्री तांबे सर तसेच श्री नाळे सर, सौ बागल मॅडम, सौ दरेकर मॅडम, श्री लालबोंद्रे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा