
बारामती, दि. १७ : नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोणी भापकर येथे आयोजित लोकशाही दिनात नागरिकांकडून एकूण 15 अर्ज स्विकारण्यात आले आहेत, या अर्जावर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करुन ते वेळेत निकाली काढावेत, असे निर्देश उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिले.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, माळेगाव न.प. मुख्याधिकारी बालाजी लोंढे, भुमी अभिलेख उपअधीक्षक संजय धोंगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा