
बारामती : वडगाव निंबाळकर येथील मुस्लिम दफनभूमीला लागूनच वॉल कंपाऊंड व रस्त्याच्या कामावरुन वरून होत असलेल्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार बारामती, श्री.गणेश शिंदे.गटविकास अधिकारी, श्री.अनिल बागल यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून भेट दिली व परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला.

स्थानिकांच्या वहिवाटीचा रस्ता बंद पडलेला आहे.सध्या सुरू असलेले बांधकाम ओढाच्या जवळ गायरान जागेत असल्याने पावसाळ्यात पुराचा धोका होवून नवीन समस्या निर्माण होऊ शकतात, अशा अनेक समस्या बाबत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून महसूल प्रशासनाच्या वतीने दि.०५/०३/२०२५ रोजी वडगांव निंबाळकर येथे समक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

येथील मुस्लिम दफनभूमीला सरंक्षण भिंत बांधण्यासाठी शासनाकडून ४० लाख रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे व प्रत्यक्षात बांधकाम सुरू झाल्यानंतर दफनभूमीला लागूनच असलेल्या झोपडपट्टी भागातील रहिवाशांचा वहिवाटीचा रस्ता बंद होत असल्याची बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली.
त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले. व रस्ता ठेवण्याची मागणी केली होती.
दफनभूमीची भिंत हि ओढ्यालगत गायरान जागेत असल्याने पावसाळ्यात ओढ्याला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या विषयावर निवेदनाद्वारे तहसीलदारांना १८ जानेवारी रोजी कळविण्यात आलेले होते.

सरंक्षण भिंत बांधकामामुळे तसेच रस्त्याच्या मागणीसाठी होत असलेल्या तक्रारीवरून बारामतीचे प्रांतअधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी मागील काही दिवसापुर्वी बारामती तहसील कार्यालयात स्थानिक तक्रारदार आणि मुस्लिम समाजातील नागरिकांचे मत विचारात घेण्यासाठी समन्वय बैठक घेतली होती, पण यामध्ये काही निर्णय झाला नाही त्यासाठी प्रत्यक्ष जागेवर येऊन भेट देण्यात येईल असे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले होते. त्यानुसार आज बुधवार दिनांक. ५ मार्च २०२५ रोजी तहसीलदार गणेश शिंदे, तसेच गटविकास अधिकारी अनिल बागल, सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन काळे यांनी प्रत्यक्ष जागेवर येवून पाहणी केली.
ओढापात्र आणि पुराचे पाणी पोहचत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
मुस्लिम दफनभूमी बांधकामाची पाहणी करत असताना नागरीकांची गर्दी झाली होती.यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले.

परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, श्री,सचिन काळे यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसह कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या होत्या.अनावश्यक नागरिकांनी गर्दी करू नये.असे पोलिसांनी आवाहन केल्याने तणाव निवळला.

आज आम्ही फक्त पाहणी करणार आहोत. कोणत्याही तक्रारीवर या ठिकाणी निर्णय होणार नाही,असे महसूल अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले,
यावेळी बहुसंख्य ग्रामस्थांसह ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर चे सरपंच श्री.सुनील ढोले, संग्रामसिंह राजे निंबाळकर, अविनाश उर्फ बाबा शिंदे, हनुमंत खोमणे, स्वप्नील गायकवाड, राकेश पवार,राहुल गायकवाड, सुनील माने, ग्रामपंचायत सदस्य संजय साळवे व अजित भोसले, सचिन साळवे, तंटामुक्ती अध्यक्ष वडगांव निंबाळकर यांचेसह उमेश शिंदे भूपेंद्र आगम, राहुल बनकर, नवनाथ धुमाळ,मुन्ना बागवान, मोहम्मद भाई इनामदार, शब्बीर बागवान, जहांगीर शेख, अजीम इनामदार, दत्तात्रय चव्हाण,राजू चव्हाण, शिवदत्त चव्हाण तसेच ग्रामपंचायत अधिकारी,श्री.अनिल हिरासकर,व वडगाव निंबाळकर चे मंडल अधिकारी श्री. गजानन पारवे,ग्राम महसूल अधिकारी श्री. संदीप कांबळे व किरण रंधवे हे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा