
बारामती : दिनांक २२/०२/२०२५ रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास मोरगाव येथे पेट्रोलिंग करीत असताना पो.स. ई. जयवंत ताकवणे पोलीस अंमलदार सचिन दरेकर सागर वाघमोडे, संतोष जावीर यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, पोलीस स्टेशन हददीतुन एक चारचाकी टेम्पो मधुन गावठी हातभट्टी देशी दारूची वाहतुक होणार आहे,अशी माहिती मिळाल्याने सदरची माहीती प्रभारी अधिकारी श्री. मनोजकुमार नवसरे,सहायक पोलीस निरीक्षक यांना सांगुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई .जयवंत ताकवणे पोलीस अंमलदार सचिन दरेकर सागर वाघमोडे, संतोष जावीर, यांनी मोरगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मोरगाव चौक येथे एक टेम्पो गाडी नं. एम एच ४२ ए क्यु २०१० ही गाडी थांबवुन गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ३५ लीटर क्षमतेचे १३ कॅन त्यामध्ये अवैध गावठी हातभट्टी दारू सुमारे ४५५ लिटर किंमत ४५०००/- व एक अवैध दारुची वाहतुक करणारा टेम्पो किंमत ३,५०,०००/- असा एकुण ३,९५,००० रुपये किंमतीचा मुददेमाल मिळुन आला आहे.

चारचाकी टेम्पो वरील चालक अभिजीत मोहन शिंदे रा. माळेगाव ता. बारामती जि पुणे यांला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. सुपा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं ३६ / २०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन.पुढील तपास पो.स.ई जयवंत ताकवणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक साो श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. गणेश बिरादार, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड यांचें मार्गदर्शनाखाली, स.पो.नि.मनोजकुमार नवसरे, पो.स. ई. जिनेश कोळी, जयवंत ताकवणे पो. हवा.रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, पो.कॉ.सचिन दरेकर, सागर वाघमोडे, संतोष जावीर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, पियुश माळी, सुरज साळुंखे यांनी केलेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा