आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी ओळखपत्राचे वाटप.
श्री.राहुल आगम यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना नेहमीच गरजेच्या गोष्टींसाठी मदत व प्रोत्साहन दिले जाते,असे शाळा नंबर एकचे श्री.अनिल गवळी गुरुजी यांनी बोलताना सांगितले.

0
1
4
5
6
9
वडगाव निंबाळकर:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ आणि नं.२ येथील एकूण २५५ विद्यार्थ्यांना दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.राहुल आगम यांच्या वतीने ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना ओळखपत्र दिल्याबद्दल दोन्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने राहुल आगम यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल आगम होते.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अजित भोसले,संतोष दरेकर, तसेच दोन्ही शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी जाधव,राहुल जाधव, दोन्ही शाळा मुख्याध्यापिका सौ.अरुणा आगम, सौ.कविता जाधव यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य स्वप्निल शिंदे,भुपेंद्र जाधव,समिर आतार,शुभांगी साळवे,मोहिनी दीक्षित,दिपाली मदने,किरण चव्हाण,पूजा चव्हाण,महेश राऊत,उपशिक्षिका विजया दगडे,सुनिता पवार,राणी ताकवले,लता लोणकर आणि पालक उपस्थित होते.
यावेळी शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी महावाचन उत्सवामध्ये प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल सार्थक जाधव,रुद्र खोमणे,आकीब आतार,वेदांत फुले,औदुंबर आगम,देवर्ष बोडरे,विराज शितोळे यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.दरम्यान राहुल आगम यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
ओळखपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गवळी, आणि आभार कविता जाधव यांनी मानले.