अभिव्यक्तीगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
राहुरीच्या पुरवठा विभागातील गोडाऊन किपर कडून पत्रकारास दमबाजी,- दोन दिवसात कारवाई न केल्यास पत्रकार उपोषण करणार !

0
1
5
2
4
6
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी : येथील दोन पत्रकार बातमी घेत असताना गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्तीने एक पत्रकार शूटिंग घेत असताना मोबाईल हिसकावुन घेतला. तसेच अरेरावी व दमदाटी करुन बातमी घेण्यास मज्जाव केला. या बाबत संबंधित गोडाऊन किपरवर दोन दिवसांत कारवाई करण्यात यावी. अन्यथा तहसील कार्यालया समोर तालुक्यातील समस्त पत्रकारांच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकारांच्या वतीने देण्यात आला.
राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील गोडाऊन जवळ दि. २ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान पुरवठा विभागातील धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने पत्रकार मनोज साळवे व अनिल कोळसे हे त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले. त्यावेळी पत्रकार मनोज साळवे हे मोबाईलवर शूटिंग घेत असताना तेथे गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्ती आला व त्याने पत्रकार मनोज साळवे यांच्या हाथातून मोबाईल हिसकावुन घेतला. आणि तुम्ही शूटिंग कशी काय घेता, शूटिंग घेण्यासाठी माझी लेखी परवानगी घेतली का? असे म्हणुन त्याने पत्रकारांना बातमी घेण्यास मज्जाव केला. या घटने बाबत राहुरी तालुक्यातील समस्त पत्रकारांनी आज दि. ५ मे रोजी एकत्र येऊन तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले. गोडाऊन किपर शिंदे याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, त्याचे निलंबन करुन खातेनिहाय चौकशी करावी, दोन दिवसांत कारवाई न झाल्यास समस्त पत्रकारांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पत्रकारांच्या वतीने देण्यात आला.
दिलेल्या निवेदनावर मनोज साळवे, अनिल कोळसे, विलास कुलकर्णी, निसारभाई सय्यद, संजय कुलकर्णी, वसंतराव झावरे,अनिल देशपांडे, राजेंद्र उंडे,सुनील भूजाडी, रफिकभाई शेख, अनिल जाधव, विनित धसाळ, मिनाष पटेकर, शरद पाचारणे, गोविंद फुणगे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, आर आर जाधव, सतिष फुलसौंदर, बंडू म्हसे, अशोक मंडलीक, रियाज देशमुख, कर्णा जाधव, सुनिल रासने, समीर शेख, आकाश येवले, राजेंद्र वाडेकर, गणेश विघे,कृष्णा गायकवाड, सचिन पवार, राजेंद्र परदेशी, दिपक साळवे, दिपक मकासरे, महेश कासार, अप्पासाहेब मकासरे, राजेंद्र पवार, प्रसाद मैड, अपना टिके, देवेंद्र शिंदे, श्रेयस लोळगे आदि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.