Breaking
अपघातआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

स्वातंत्र्य विद्यामंदिर प्रशालेत हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

0 1 4 5 6 9

बारामती: गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर प्रशालेत हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला व हुतात्मा दिन तसेच महात्मा गांधी पुण्यतिथी या विषयावर आपापले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. बी.एल.काळे सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशालेचे प्राचार्य श्री. हेमंत तांबे सर यांनी विद्यार्थ्यांना हुतात्मा दिन व महात्मा गांधी यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

महात्मा गांधी आठवड्यातून एक दिवस मौन पाळत असत.त्यांच्याच प्रेरणेने या वेळी विद्यार्थ्यांनीही मौन पाळले. मौन धारण केल्यामुळे आत्मिक समाधान ब आनंद मिळतो.मौन पाळण्याचे फायदे व महत्व काय असते ते श्री.अनिल पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे