Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव निंबाळकर पोलिसांकडून नागरिकांना दिलासा देणारी कामगिरी, ५,५०,००० रुपये किंमतीचा जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदारांना प्रदान

पुणे ग्रामीण, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री.गणेश बिरादार यांच्या विशेष प्रयत्नातून फिर्यादी तक्रारदार यांना त्यांचा चोरी झालेला मुद्देमाल परत करण्यासाठी प्रयत्न.

0 1 4 5 6 9

बारामती : वडगाव निंबाळकर पोलीसांकडून घरफोडी,चोरी,जबरी चोरी अशा विविध दाखल गुन्ह्यातील आरोपींकडुन जप्त केलेला एकूण किंमत ५,५०,०००/- रूपये किमतीचे सुवर्णालंकार (दागिने) तसेच भ्रमणध्वनी (मोबाईल फोन) व काही रोख रक्कम असे फिर्यादी तक्रारदार यांना आज दिनांक १०/१२/२०२४ रोजी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या आवारात एक विशेष कार्यक्रम आयोजित करून प्रदान करण्यात आला.

आरोपी कडून जप्त केलेला मुद्देमाल खरं तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच परत दिला जातो.ज्यांची चोरी किंवा जबरी चोरी झाली आहे किंवा दरोडा टाकून लुट झाली आहे त्यांना एका विशिष्ट कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून परत दिला जातो, परंतु पुणे ग्रामीणच्या बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक, श्री.गणेश बिरादार यांच्या पुढाकाराने विशेष प्रयत्नातून कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेतून न जाता, फिर्यादी यांना कायदेशीर त्रास होऊ नये याची काळजी घेत सदर मुद्देमाल तक्रारदार यांना विनासायास कसा दिला जाईल याचा विचार करून फिर्यादी तक्रारदार यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला.

यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने मा. श्री. पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली, मा. श्री गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, यांच्या शुभ हस्ते श्री सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती विभाग बारामती यांचे प्रमुख उपस्थितीत, श्री.सचिन काळे, प्रभारी अधिकारी, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन  पोसई राहुल साबळे, पोसई दिलीप सुतार, पोहवा महेश पन्हाळे, अनिल खेडकर,हृदयनाथ देवकर,पोपट नाळे, विलास ओमासे पो.शि. प्राजक्ता जगताप तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून सदरचा मुद्देमाल परत करण्यात आला.

मुद्देमाल परत मिळविणारे तक्रारदार खालील प्रमाणे आहेत.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १९१/२०१९ मधील फिर्यादी श्री. जगन्नाथ दादा खोमणे रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे

गुन्हा रजिस्टर नंबर २८१/२०२१ मधील फिर्यादी सौ. लक्ष्मी देविदास गवळी रा.उंडवडी सुपे ता. बारामती जि. पुणे

गुन्हा रजिस्टर नंबर ४१५/२०२२  मधील फिर्यादी सौ. पुष्पलता बाळासाहेब जगताप रा. चोपडज ता. बारामती जि. पुणे

गुन्हा रजिस्टर नंबर ६२/२०२१ मधील फिर्यादी रोहन अशोक गायकवाड रा.सोनकसवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे

गुन्हा रजिस्टर नंबर २९१/२०२४ मधील फिर्यादी कुसुम सोमनाथ बालगुडे रा. मोडवे तालुका बारामती जिल्हा पुणे.

गुन्हा रजिस्टर नंबर १६७/२०२२ मधील फिर्यादी सौ.अनिता उत्तम जगदाळे राहणार मूर्टी,ता. बारामती जिल्हा पुणे

गुन्हा रजिस्टर नंबर ४३४/२०२४ फिर्यादी सौ. नीलम तानाजी खोमणे राहणार मूर्टी,तालुका बारामती जि.पुणे

यांना त्यांचे घरफोडी, चोरी,जबरी चोरी गुन्हयातील चोरीस गेलेल्या माला पैकी आरोपींकडुन जप्त करण्यात आलेला मुद्देमाल एकूण ७ तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीच्या ५ पट्ट्याा व रोख रक्कम ७९६० रूपये असा एकूण ५,५०,०००/- रुपये किमतीचा गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल परत करण्यात आला.

चोरी झालेल्या चिजवस्तू परत मिळाल्याने तक्रारदार यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती व त्यांनी वडगांव निंबाळकर पोलीसांचे तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले.

पोलिसांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक या वेळी काही नागरिकांनी केले.

वरील कामगिरी दिलासा देणारी असली तरी आजही वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील काही चोऱ्यांचा उलघडा झालेला नाही किंवा त्या चोरी प्रकरणात आजही समाधान कारक तपास झालेला दिसत नाही त्यात प्रामुख्याने होळ येथील ढगाई माता मंदिरातील चोरी असेल किंवा मूर्टी मोढवे येथील मरिमाता मंदिरातील चोरी असेल या घटना नागरिकांच्या धार्मिक आस्थेशी संबंधित आहेत व त्यात लवकरात लवकर समाधानकारक तपास व्हावा अशी नागरीकांमधून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे