
बारामती: दिनांक १९ में २०२५ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास माळेगाव बुद्रुक नीरा बारामती रोड लगत असलेल्या स्मशानभूमीत एका इसमाने झाडाला लटकवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
सदर इसम हा बिगारी कामगार असल्याबाबतची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अंगात पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, हातात लाल कापडी पिशवी असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सादिक सय्यद यांनी घटनास्थळी उपस्थित राहून कार्यवाही सुरु केली दरम्यान सदर इसमाचे नांव राजेंद्र दडस रा.लकडेनगर, माळेगाव बुद्रुक असल्याचे समोर आले आहे.

घटनास्थळीची कार्यवाही पूर्ण करून प्रेत सिल्व्हर ज्युबिली बारामती येथे पाठवले आहे.
अधिकचा तपास माळेगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमर थोरात करत आहेत.
सदर घटनेची माहिती माळेगाव येथील जागरूक पत्रकार श्री संदीपजी आढाव यांना मिळाली त्यांनी तात्काळ माळेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधत पाठपुरावा करून कार्यवाही तडिस नेली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा