
बारामती : दिनांक २७/०२/२०२५ रोजी दुपारी १२/३० वा. सुमारास मौजे निरवांगी, ता. इंदापुर, जि. पुणे गावच्या हद्दीमध्ये उत्तम जालिंधर जाधव, रा. खौरोची ता इंदापुर, जि.पुणे हे प्लसर या दोन चाकी गाडीवरुन निरवांगी गावच्या हद्दीमधील वीर वस्तीच्या पलीकडे स्वतःच्या जे.सी.बी वरील ड्रायव्हरला जेवणाचा डबा देण्यासाठी निघालेले असताना,राजु भाळे, नाना भाळे, तुकाराम खरात, निरंजन पवार, रामा भाळे, दादा आटोळे, शुभम आटोळे, स्वप्नील वाघमोडे व त्यांच्या सोबत असलेला इतर एकजण यांनी चार चाकी व दोन चाकी गाडीमधुन येत उत्तम जाधव यांच्या दुचाकी गाडीला चार चाकी गाडी आडवी मारुन तुला लय मस्ती आलीय का, तु आमच्या दुश्मन असलेल्या लोकांना मदत करतो, आमच्या टिपा देतो, आमच्या भांडणात मध्यस्थी करतो असे म्हणत राजु भाळे व त्याच्या सोबत असलेल्या साथिदार यांनी उत्तम जाधव यास लोखंडी कोयते, लोखंडी तलवारीने डोक्यावर, पाठीवर तसेच पायावर वार केले तसेच जवळ पडलेले दगड उचलुन अंगावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले होते.
त्यानंतर त्यांना उपचारसाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अकलुज येथे नेवुन ॲडमिट केल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार बुणगे यांनी निरवांगी ता इंदापुर येथे घटनास्थळवरती भेट देवुन नक्की काय प्रकार आहे याबाबत माहित घेवुन त्यांची सर्व माहिती ही मा. पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिक्षक साो, बारामती उपविभाग व मा. पोलीस निरीक्षक साो, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे यांना दिली होती.
त्यावेळी मा. पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो, बारामती व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, बारामती उपविभाग यांनी तपासकामी दिलेल्या सुचनेप्रमाणे उत्तम जाधव यांना मारहाण करणारे सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी वालचंदनगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मिळुन एकत्रित टिम तयार करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या भागात रवाना केल्या होत्या.

यादरम्यान उत्तम जाधव उपचार सुरू असताना ते उपचारा दरम्यान मयत झाले. त्यानंतर सदर घटनेच्या अनुषंगाने उत्तम जाधव यांचा भाऊ शामराव जालिंदर जाधव यांच्याकडे चौकशी करुन त्यांची लेखी फिर्याद घेवुन वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सदर गुन्हयाचा तपास करत असताना आरोपी राजु भाळे व त्याच्या सोबतचे इतर ०३ आरोपी हे भिगवण राशीन रोडवर असुन ते हैद्राबाद याठिकाणी पळुन जाण्याची तयारी करत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्याने लागलीच सदर ठिकाणी तपास पथकाच्या टिम पाठवुन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर गुन्हयातील आरोपी राजेंद्र ऊर्फ राजु भाळे, नाना भाळे, रामा ऊर्फ रामदास भाळे, शुभम ऊर्फ दावा आटोळे, स्वप्नील ऊर्फ बालाजी वाघमोडे हे सदर ठिकाणी मिळून आले.

त्यावेळी आरोपींना तपास पथकाच्या टिमने पाठलाग करुन शिताफिने पकडुन त्यांना पुढील कारवाईसाठी वालचंदनगर पोलीस ठाण्यात आणले आहे.

या गुन्हयाचा तपास श्री.राजकुमार डुणगे,सहा.पोलीस निरीक्षक,वालचंदनगर पोलीस ठाणे,हे करत आहे.

या गुन्हयातील मयत व त्याचे इतर साथीदार व अटक आरोपी हे एकाच गावामध्ये राहणारे असुन त्यांच्यामध्ये गेले अनेक वर्षापासुन गावातील वर्चस्वाची लढाई सुरू होती याच कारणांमुळे त्यांच्यामध्ये वेळोवेळी वाद होवुन त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दिनांक २५/०२/२०५ रोजी पप्पु हेगडकर हा बाळु मामाची मेंढरे चारण्यासाठी गेलेला असताना अंकित कांबळे याने त्यास दमदाटी केली होती. त्या कारणांवरुन दिनांक २७/०२/२०२५ रोजी आरोपी व संकेत हेगडकर यांच्यामध्ये खोरोची ता. इंदापुर येथे झालेल्या वादातुन आरोपी राजु माळे व त्याचे इतर साथिदार यांनी मिळून संकेत हेगडकर यांच्यावर गोळीबार केला होता त्याअनुषंगाने इंदापुर पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे दाखल आहेत.तसेच आरोपी राजेंद्र ऊर्फ राजु भाळे तसेच त्याचे इतर साथीदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर पुणे, सातारा, सोलापुर, अहिल्यानगर या जिल्हांमधील पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा.श्री. पंकज देशमुख साो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिरादार सो,अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा.श्री. डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री.अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा विभाग, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे श्री.राजकुमार डुणगे सहा.पोलीस निरीक्षक, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कुलदिप संकपाळ तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक मिलीद मिठापल्ली, पोलीस उप-निरीक्षक विजय टेळकीकर, पोहवा गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, जगदीश चौधर, गणेश काटकर, दादासाहेब डोईफोडे, दत्तात्र्य चांदणे, महेश पवार, विकास निर्मळ, अभिजीत कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोफौ बाळासाहेब कारंडे, पोहवा अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, अतुल ढेरे यांनी पार पाडली आहे.
पोलिसांना शाबासकी.
या दमदार कामगिरीबद्दल मा.वरिष्ठांनी वालचंदनगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा