अपघातक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
‘सोमेश्वर प्रीमियर लीग’ उत्साहात संपन्न. श्रीनाथ टायगर, वडगाव निंबाळकर प्रथम क्रमांकाचा विजेता संघ
लीग मध्ये एकूण बारा संघांचा समावेश, श्रीनाथ टायगर, वडगाव निंबाळकर प्रथम क्रमांकाचा विजेता संघ

0
1
4
5
6
9
बारामती: ग्रामीण भागातल्या युवक तरुणांना खेळण्याचे एक व्यासपीठ मिळावं सध्याची तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये आरोग्यदायी राहावी म्हणून सोमेश्वर परिसरातील युवकांच्या संकल्पनेतून सोमेश्वरनगर करंजे येथे गलांडे पाटील मैदान तयार केले याचा फायदा सर्वांनाच होत आहे.. या ठिकाणी आठवड्यातील रविवार सुट्टी दिवशी मोठे क्रिकेट सामने भरतात यामध्ये बारामती तालुक्यातील स्पर्धक खेळाडू येथे येत असतात. दरवर्षीप्रमाणे बारामती पश्चिम तालुक्यातील ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंसाठी भरण्यात आलेल्या सोमेश्वर प्रीमियर लीग पर्व चौथे करंजे येथे उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेसाठी बारा संघांनी नोंद केली होती आयोजित क्रिकेट स्पर्धा बुधवार दि २९ जानेवारी सुरुवात तर या स्पर्धेची रविवारी दि.२ तारखेला सांगता झाली . प्रथम,द्वितीय,तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या बक्षिस वितरण कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते ट्रॉफी सन्मान चिन्ह देत पार पडला. यावेळी बारामतीच्या पश्चिम भागातील आलेल्या खेळाडू तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी “विशेष मॅच” म्हणून पोलीस पत्रकार क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता यामध्ये पत्रकार संघाने अधिकची धावसंख्या देत पोलीस संघाला आव्हान दिले परंतु पोलीस संघाने दिलेली धावसंख्या पूर्ण करत विजय मिळवला विजयानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देत पोलीस संघाला गौरविण्यात आले.
‘सोमेश्वर प्रीमियर लीग’ पर्व चार मध्ये विजेते झालेले संघ खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक,श्रीनाथ टायगर वडगाव,
द्वितीय क्रमांक, ईशान स्मॅशर्स करंजे,
तृतीय क्रमांक, डी एस पॅंथर मुरूम,
चतुर्थ क्रमांक, डीजे लाईन्स मोरगाव
हे संघ बक्षीस पात्र ठरले,
प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार रुपयांचे बक्षीस नवनाथ उद्योग समूह अध्यक्ष व श्री सोमेश्वर कारखाना संचालक संग्राम सोरटे यांनी दिले तर द्वितीय ३१ हजार रुपये बक्षीस रेणुका इंडस्ट्रीजचे चांगदेव धुर्वे ,२५ हजार चे बक्षीस विजय कोळपे व राजेंद्र भांडवलकर तर चतुर्थ क्रमांकास २१ हजार रुपये बक्षीस रामभाऊ हाके व भरत हगवणे यांनी दिले.